संशयित आरोपीने केली तुरुंगात आत्महत्या, कारण काय,वाचा..

0
पंढरपूर : लैंगिक अत्याचार प्रकरणी मंगळवेढा येथील कारागृहात असलेल्या एका संशयित आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास मंगळवेढा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सब जेलमध्ये घडली.

 

तानाजी शंकर ढिसवे (वय 21 रा. शिरनांदगी ता. मंगळवेढा) असं आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संशयित आरोपी तानाजी याच्यावर लैंगिक अत्याचारासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत.

 

Rate Card

याप्रकरणी संशयितास मंगळवेढा न्यायालयाने जामीन नाकारला. सध्या त्याला येथील सब जेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याने सब जेलमध्ये आत्महत्या केली आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.