Online प्रेम पंढरपूरातील शिक्षकाला पडलं महागात ! | 12 लाख 40 हजाराला घातला गंडा 

0
1
पंढरपूर: सोशल मीडियातील ओळख एका शिक्षकाला चांगलीच महागात पडली आहे.सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून लंडन येथील एका महिने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील एका शिक्षकाला 12 लाख 40 हजार रूपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सध्य़ाच्या काळात सर्वच वयोगटातील लोक आपला वेळ सोशल मीडीयावरती घालवत असतात. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक झाल्याच्या घटना देखील समोर येत आहेत.

 

सोशल मीडियावर खोटी आयडी तयार करुन लोकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याची अनेक प्रकरण समोर असतानाच आता थेट पंढरपूर ते लंडन अशी फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

सोशल मिडियावरून लंडन मधील युनायटेड किंगडम येथील एलिझाबेथ स्मिथ नामक महिलेने प्रेमाचा बहाना करून सांगोला येथील शिक्षक नागनाथ दुधाळ यांना लाखो रूपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दुधाळ यांनी संबंधित महिले विरोधात पोलिस सांगोला ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ भिमराव दुधाळ या शिक्षकाची डिसेंबर 2021 मध्ये फेसबुकवर लंडन मधील स्मिथ नावाच्या महिलेशी मैत्री झाली. त्यानंतर स्मिथ नामक या महिलेने फिर्यादी नागनाथ दुधाळ या शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून गिफ्ट व पौंड स्वरूपात असलेला चेक पाठविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवळी 12 लाख 40 हजार रूपयांना गंडा घातला आहे.याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुधाळ यांनी पोलीसात धाव घेतली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here