गाडगेबाबा, बागडेबाबा यांचे विचार आचरणात आणा- तुकाराम बाबा

0
जत : राष्ट्रीय संत गाडगेबाबा, बागडेबाबा यांनी आयुष्यभर समाजातील चुकीच्या रूढी, परंपरेवर प्रहार केला. आजही समाजात अंधश्रद्धा फोफावत आहे. समाजातील चुकीच्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गाडगेबाबा, बागडेबाबा यांचे विचार आचरणात आणा असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ , सांगली संत गाडगेबाबा परीट समाज, जत यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा वधु वर सुचक मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोहर साळुंखे होते.

 

यावेळी शर्मिलाताई शिंदे, सूर्यकांत परीट, विजय खेडकर, चंद्रशेखर परीट,  हनुमंत साळुंखे, विनायक शिंदे , बबन शिंदे, अनिल शिंदे, अनिल साळुंखे , कुमार गायकवाड ,रोहन परीट, कैलास शिंदे, रविंद्र यादव ,संजय जांभळे , राजेंद्र पावशे ,सुभाष दळवी, शंकर परीट, अशोक भंडारे, राजेंद्र साळुंखे, शिवाजी साळुंखे ,  राम परीट , शिवानंद परीट, सदानंद परीट ,रमेश परीट , सुनील परीट , महेश परीट , दीपक गायकवाड ,  सतीश शिंदे , अप्पू शिंदे , बापुसाहिब साळुंखे, समाधान साळुंखे , सत्यजित साळुंखे, नंदकुमार शिंदे, गजानन चव्हाण, बबन साळुंखे , राजु कोरे ,अमोल कोरे, सागर काळे, भारत गायकवाड यांच्यासह सांगली, सोलापूर ,कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
समाजातील गोरगरिबांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून कोरोना, अपघात आदी घटनेच्या वेळी मदत केल्याचे सांगून तुकाराम बाबा यांनी समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरेवर प्रहार केला.अध्यक्षीय समारोपात बोलताना मनोहर साळुंखे यांनी समाजाला एकीने रहावे असे आवाहन केले.
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.