काँग्रेसचे अस्तित्व राहिले तरी कुठे ; राधाकृष्ण विखेपाटील

0
कोल्हापूर : शिंदे सरकारमध्ये महसूल मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे अस्तित्व राहिले तरी कुठे, मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळावं यासाठी फक्त काँग्रेसचं अस्तित्व होतं, असे ते म्हणाले. तसेच सध्या राज्यात जनतेच्या मनातलं सरकार आलेलं आहे. जनतेच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करू, असेही विखे पाटील म्हणाले.

मंत्रीपद मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदाच कोल्हापुरात आले आहेत. आज श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे आणि ज्योतिबाचे दर्शन घेणार आहेत. तसेच वारणा येथील वारणा दूध प्रकल्पाला ते भेट देणार असून यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहेत. मी पूर्वीपासून कोल्हापूरमध्ये शिकायला होतो. यामुळे श्री निवासिनी अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर हे आपले श्रद्धास्थान आहे. पहिल्यांदाच नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. यामुळे आज कोल्हापूरला आलो असून दर्शनासोबतच जिल्ह्याची माहिती देखील घेणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Rate Card

काँग्रेसचं अस्तित्व राहिलंय तरी कुठे?
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले महसूल मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे अस्तित्व राहिले तरी कुठे, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली आहे. गेल्या सरकारमध्ये काँग्रेस पक्ष हा फक्त मंत्री पद मिळवण्यासाठी होते. काँग्रेसमधील नेत्यांना आणि पक्ष नेतृत्वाला आता पक्षात कुठलेही स्वारस्य राहिलेले नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांना इशारा दिला. नगर जिल्हाच नाहीतर संपूर्ण राज्यात वाळू माफियांचा उच्छाद दिसून येतोय. ही राज्याला लागलेली कीड आहे. या अवैध धंद्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. याला थांबवणं गरजेचं असल्याचं विखे पाटील म्हणाले.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.