कडेगावची हंडी फोडून ‘शिवनेरी’ची हॅट्रिक

0

कोल्हापूर, इस्लामपूरनंतर कडेगावमध्ये करिष्मा : हॅट्रिकबद्दल मुख्याधिकाऱ्यांकडून सत्कार

तासगाव : माजी मंत्री विश्वजित कदम व युवा नेते जितेश कदम यांच्यावतीने कडेगाव येथे आयोजित करण्यात आलेली दहिहंडी तासगावच्या शिवनेरी मंडळाच्या गोविंदानी फोडली. सात थर रचत मंडळाच्या गोविंदानी ही हंडी फोडून लाखाचे बक्षीस मिळवले. कोल्हापूर, इस्लामपूरनंतर सलग तिसऱ्या दिवशी कडेगावची हंडी फोडून मंडळाने हॅट्रिक केली. या करिष्म्याबद्दल तासगावचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी मंडळाचा सत्कार केला.

 

शिवनेरीचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्या हत्येचे दुःख पचवत गोविंदांनी यावर्षी दहीहंडी स्पर्धेत आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली आहे. शिवनेरी हे पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेले गोविंदा पथक आहे. आतापर्यंत 125 हुन अधिक हंड्या या मंडळाने फोडल्या आहेत. अनेक सामाजिक उपक्रमातही मंडळाचा सक्रिय सहभाग असतो. दुर्दैवाने 15 दिवसांपूर्वी या मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांची पाठीमागून वार करून हत्या झाली.

 

जाधव यांच्या हत्येनंतर संपूर्ण मंडळ खचून गेले आहे. मात्र, सगळे दुःख पचवून मंडळाचे सदस्य पुन्हा जोमाने स्पर्धेला सामोरे जात आहेत. राज्यातील विविध ठिकाणी आयोजित स्पर्धेला हे मंडळ हजेरी लावत आहे. ‘आता रडायचं नाही तर लढायचं’ या भावनेतून संपूर्ण मंडळ पेटून उठले आहे. आपला खेळ दाखवत ठिकठिकाणच्या हंड्यांवर आपले नाव कोरले जात आहे.

Rate Card

 

गेल्या तीन दिवसांपासून या मंडळाने कोल्हापूर, इस्लामपूर व कडेगाव येथील दहिहंड्या फोडून हॅट्रिक केली आहे. पहिल्याच दिवशी कोल्हापूर येथील निष्ठावंत शिवसैनिकांनी आयोजित केलेली ‘निष्ठा दहीहंडी’ फोडून मंडळाने जोरदार श्रीगणेशा केला. दुसऱ्या दिवशी इस्लामपूर येथील महाडिक युवा शक्तीने आयोजित केलेली दहिहंडी सात थर रचत फोडली. तर सलग तिसऱ्या दिवशी (रविवारी) कडेगाव येथे माजी मंत्री विश्वजित कदम व युवा नेते जितेश कदम यांच्यावतीने आयोजित ‘विश्वजितेश’ दहिहंडी फोडून हॅट्रिक साधली.

 

पुढील आठडाभरात राज्यातील अनेक दहीहंड्यांना हे मंडळ हजेरी लावणार आहे. यावर्षी जास्तीत जास्त हंड्या फोडून मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांना श्रद्धांजली वाहण्याचा शिवनेरीचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने जिद्दीने सर्व मंडळ स्पर्धेला उतरले आहे.

 

जल्लोषाला पूर्णपणे फाटा…!

शिवनेरी मंडळ तसे राज्यात नावाजलेले मंडळ आहे. सुमारे 650 गोविंदांचे हे पथक आहे. आतापर्यंत 125 हुन अधिक हंड्या या मंडळाने सहजरित्या फोडल्या आहेत. विजय, जल्लोष या मंडळाला नवा नाही. मात्र 15 दिवसांपूर्वी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्यावर विश्वासघाताने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मंडळ दुःखाच्या छायेत आहे. या परिस्थितीतही मंडळ स्वतःवर ओढवलेले दुःख बाजूला सारून स्पर्धेला उतरले आहे. ठिकठिकाणी हंड्या फोडल्या जात आहेत. मंडळाच्या प्रत्येक सदस्याच्या एका डोळ्यात हंडी फोडल्याचा आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अनिल जाधव यांच्या हत्येमुळे अश्रू असतात. त्यामुळे यावर्षी जिथे जिथे हंड्या फोडल्या जात आहेत त्याठिकाणी मंडळाच्या सदस्यांकडून जल्लोष टाळला जात आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.