५० कोटी घेऊन भारत सोड किंवा आत्महत्या कर

0

मुंबई : अधिवेशनाचा कालचा दिवस चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांनी काही गौप्यस्फोट केले आहेत. भारत देश सोडला तर ५० कोटी मिळतील, असे प्रलोभन आपल्याला देण्यात आल्याचे शर्मा म्हणाल्या आहेत. माझ्यावर दबाव टाकला जातोय. माझ्या आईने जशी आत्महत्या केली, तसेच मीही आत्महत्या करावी, यासाठी प्रवृत्त केले जात आहे. पण मी घाबरत नाही, मी लढत राहीन. करुणा शर्मांनी सांगितले की, माझ्यावर अॅट्रॉसिटीच्या दोन खोट्या केसेस करण्यात आल्या आहेत. त्या केसेस मागे घ्याव्यात अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर आपण योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन मला त्यांनी दिले आहे.

 

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस गाजला तो तुफान फटकेबाजीने. अजित पवार, छगन भुजबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे यांच्यातली शाब्दिक चकमक चांगलीच गाजली. त्यातच मुख्यमंत्री शिंदेंनी करुणा शर्मांवरुन धनंजय मुंडेंना टोला लगावला आणि लगेच संध्याकाळी करुणा शर्मा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला पोहोचल्या.

करुणा शर्मा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला न्याय मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्याकडून मला न्याय मिळेल, असा विश्वास आहे. मला आधी १६ दिवसांसाठी नंतर ४१ दिवसांसाठी तुरुंगात टाकण्यात आले. मुख्यमंत्री शिंदेंना मी माझ्या अडचणी सांगितल्या आहेत.

Rate Card

 

मी कोल्हापुरातून निवडणूक लढवली, तेव्हा माझ्यावर हल्ला करण्यात आला. माझे व्हिडीओ तयार केले जात आहेत. एडिटिंग सुरू आहे, असे मला सांगितले जात आहे. बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मी आता ६० उमेदवार उभे करणार आहे. धनंजय मुंडेंनी मला पराभूत करून दाखवावे, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना आव्हानही दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.