खलाटीतील श्री.लक्ष्मीदेवी मंदिर परिसरात वॉटरएटीएम | दिग्विजय चव्हाण यांचा पुढाकार

0
जत,संकेत टाइम्स : पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या फंडातून खलाटी ता.जत येथील श्री.लक्ष्मी मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या वॉटर एटीएमचे उद्घाटन  लवकरचं‌ होणार आहे,अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
चव्हाण यांच्या फंडातून मतदार संघातील कुडणूर,खलाटी,जिरग्याळ व शिंगणापूर येथे ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून वॉटर एटीएम बसविण़्यात येत आहेत.कुडणूर येथील पहिल्या वॉटर एटीएमचे उद्घाटन दिग्विजय चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले आहे.तर आज खलाटी येथील एटीएमचे उद्घाटन होत आहे.

 

पंचायत समितीचे सदस्य झाल्यापासून दिग्विजय चव्हाण यांनी मतदार संघातील नागरिकांच्या हितासाठी प्रयत्न केले आहेत.सातत्याने ते स्थानिक विविध प्रश्नासाठी काम करत असतात.नव्या धोरणानुसार पंचायत समिती सदस्यांना मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगातील १० टक्के रक्कमेतून चार गावांना वॉटर एटीएम तर डफळापूर,मिरवाड,शेळकेवाडी येथे वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते मुरमीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यात या भागातील शेतकरी,नागरिकांना यांचा फायदा होणार आहे.

 

दिग्विजय चव्हाण म्हणाले,पंचायत समितीच्या माध्यमातून मतदार संघातील गावातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो.रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून आम्ही हे वॉटर एटीएम ग्रामपंचायतीना दिले आहे.या माध्यमातून ग्रामस्थांना फिल्टर पाणी मिळणार आहेचं त्याबरोबर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.कुडणूर,शिंगणापूर येथे असणाऱ्या पाणी टंचाईवरही मार्ग काढून नागरिकांना कायमस्वरूपी मुबलक पाणी मिळावे,यासाठी माझा यापुढे प्रयत्न राहिल.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.