महाराष्ट्र बँकेला टाळे ठोकण्याचे आंदोलन मागे ; पुढील पंधरवड्यात कर्मचारी नेमण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आश्वासन

0
डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत लवकरात लवकर कर्मचारी नेमणूक करू असे आश्वासन वरिष्ठ प्रबंधक  संतोष कांबळे यांनी दिल्याने कॉ.हणमंत कोळी यांनी टाळे टोकू आंदोलन मागे घेतले आहे.

 

डफळापूर येथे एकमेव असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत गेल्या दोन महिन्यापासून कर्मचारी नसल्याने मोठ्या अडचणीचे ठरत आहे.कर्मचारी नसल्याने खातेदारांची हेळसाड होत आहे.एक अधिकारी,एक लिपिक,एक शिपाई हे तिघे मोठे व्यवहार असलेली बँक चालवित आहे.त्यांच्यावर मोठा भार असल्याने ग्राहकांना सेवा देऊ शकत नाही.कनिष्ठ अधिकारी नसल्याने अनेक नवी कर्जेही रखडली आहेत.

 

या पार्श्वभूमीवर कॉ.हणमंत कोळी यांनी कर्मचारी नेमण्याच्या मागणीसाठी टाळे टोकण्याचा इशारा दिला होता.त्या अनुषंगाने बँकेच्या व्यवस्थापना कडून बुधवारी बैठक घेण्यात आली.त्यावेळी वरिष्ठ प्रबंधक श्री.कांबळे यांनी वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवून कर्मचारी नेमावेत यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी डफळापूर शाखेचे शाखाधिकारी धनपाल कांबळे व खातेदार उपस्थित होते.
डफळापूर शाखेत झालेल्या बैठकीत वस्तूनिष्ठ परिस्थिती सांगताना कॉ.हणमंत कोळी
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.