जत तालुक्याचे युवा आयडॉल तम्मनगौडा रविपाटील
तम्मनगौडा रविपाटील हे तालुक्यातील उच्चशिक्षीत व तरूण नेतृत्व आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अल्पावधीतच त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. सांगली जिल्हा परिषदेचे ते शिक्षण, आरोग्य व क्रीडा या अत्यंत महत्वाच्या खात्यांचे सभापती म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे.भाजपचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे. अल्पावधीतच त्यांनी तालुक्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक राजकीय नेते, धार्मिक संत पुरूष यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत.
तम्मनगौडा रविपाटील यांचा जन्म जत तालुक्यातील जाडरबोबलाद गावी दि. 25 ऑगष्ट 1982 रोजी झाला आहे. एम. कॉम. एम.बी.ए असे उच्च शिक्षण त्यांनी घेतले आहे. शेती, व्यवसाय यांचा मोठा व्याप असूनही त्यांनी आपल्या घराण्याची परंपरा कायम ठेवून राजकारणात प्रवेश केला आहे. आमदार विलासराव जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची घोडदौड सुरू आहे.
तम्मनगौडा रविपाटील यांचा जन्म जत तालुक्यातील जाडरबोबलाद गावी दि. 25 ऑगष्ट 1982 रोजी झाला आहे. एम. कॉम. एम.बी.ए असे उच्च शिक्षण त्यांनी घेतले आहे. शेती, व्यवसाय यांचा मोठा व्याप असूनही त्यांनी आपल्या घराण्याची परंपरा कायम ठेवून राजकारणात प्रवेश केला आहे. आमदार विलासराव जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची घोडदौड सुरू आहे.
जतच्या राजकारणात अनेक घराण्यांचा प्रभाव आहे. त्यापैकी एक आहे, जाडरबोबलाद येथील रविपाटील घराणे. या घराण्यातील सिद्रामप्पा रवि हे जत पंचायत समितीचे उपसभापती होते. अनेक वर्षे जिल्हा परिषद सदस्य होते. ईश्वराप्पा रवि हेही जिल्हा परिषद सदस्य होते. सिद्रामप्पा रवि यांचे सुपुत्र शिवाप्पा उर्फ पंपू रवि हे पंचायत समिती सदस्य होते. अनेक वर्षांपासून या परिसरात वर्चस्व असलेले हे घराणे आहे. मोठा लोकसंग्रह, तालेवार शेतकरी, लोकांना सर्वोतोपरी मदत करण्याचा स्वभाव त्यामुळे आजही त्यांचा तालुक्यातील राजकारणात प्रभाव आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण या सर्वच क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहे.
अगदी तरूण वयात तम्मनगौडा रविपाटील हे जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदार संघातून 2017 साली भाजप सदस्य म्हणून निवडून आले. त्यांना जि.प. आरोग्य, शिक्षण व क्रीडा या विभागाच्या सभापतीपदाचा बहुमान मिळाला आहे. जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या अस्थापना असलेल्या या दोन्ही विभागाची धूरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. आरोग्य केंद्रे व शाळांत अनेक सुविधा त्यांनी निर्माण केल्या आहेत. ऊर्जा निर्मितीत शाळा स्वयंपूर्ण बनविण्याचा त्यांना उपक्रम आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, डिजीटल क्लासरूम, पहिलीपासून इंग्रजी हे उपक्रम त्यांनी राबविले आहेत.जाड्डरबोबलाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. भाजपने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली आहे. तरूण सभापती म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. जाडरबोबलाद, सोन्याळ, अंकलगी व बालगाव या चार गावांसाठी त्यांनी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून आणल्या आहेत. रस्ते, शाळांच्या इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी मोठा निधी आणला आहे. तालुक्यात नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे.
बालगाव येथील श्री गुरूदेव आश्रममध्ये आयोजित ग्रामीण ऐतिहासिक योग उत्सवाने चार विश्वविक्रम केले. या उपक्रमासाठी त्यांच्या सर्व टीमसह स्वत: तम्मणगौडा रवीपाटील यांनी मोठे योगदान दिले आहे. आरोग्य विभाग सक्षम केला. ऑनलाईन केला. आरोग्य विभागाचे उत्पन्न 50 लाखांनी वाढविले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य महाशिबीराची संकल्पना अंमलात आणली जतमध्ये प्रथमच जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबीर घेऊन हजारो रूग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. दिव्यांगांसाठी प्रथमच तालुक्यात पहिल्यांदाच आरोग्य शिबीर घेतले. शिक्षकांच्या रिक्तपदाचा मोठा अनुशेष होता. शिक्षकांची अनेक रिक्त पदे भरली.
शाळा दुरूस्ती, नवीन इमारतींसाठी निधी दिला.शिक्षण विभाग सक्षम केला. शाळा व शिक्षणास शिस्त लावली. अनेक अभिनव उपक्रम राबविले. जाडरबोबलाद मतदार संघात प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सडक योजनेतून अनेक कोटीचा निधी अशी अनेक उल्लेखनिय कामे केली आहेत. तालुक्याच्या राजकारणातील ते आयडॉल बनले आहेत.गेल्या चार वर्षात तालुक्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांनी राजकीय पटलावर नाव कोरले आहे.जाड्डरबोबलाद मतदार संघा पुर्ते मर्यादित न राहता तालुक्यातील अनेक प्रश्नावर ते काम करत आहेत.भविष्यातील आमदारकीच्या उमेदवारीतील ते एक प्रभावी दावेदार आहेत.
शंब्दाकन ; कामाण्णा बंडगर,माडग्याळ

