Jath | जतमध्ये वीजवाहक तार अंगावर पडून दोन तरुणांचा मृत्यू

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरालगत असलेल्या पाटील मळा येथे गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास अति उच्च दाबाची वीज वाहक तार अंगावर पडल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. जत घाडगेवाडी रस्त्यावर पाटील वस्ती येथे गुरुवारी सायंकाळी तरुण शेतकरी रोहित अजित पाटील (वय १६ ) व शिवाजी पांडुरंग महानुर (वय २६) हे शेतात मळणीसाठी रास करत होते.

 

याचवेळी शेतातून गेलेली अति उच्च दाबाची ११ केव्ही वीजवाहक तार तुटून रोहित पाटील यांच्या अंगावर पडली, त्याला बाजूला करत असताना त्याचा दुसरा मित्र शिवाजी महाणूर यालाही विजेचा जोरदार झटका बसला.

 

यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. वीजेचा धक्का बसल्यानंतर रोहित याला वाचविण्यासाठी त्याची आई पुढे सरसावली होती. तिलाही धक्का बसून ती बाजूला पडली, त्यामुळे ती बचावली असली तरी जखमी झाली आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.