जतच्या सिध्दार्थ संस्थेने जोपासली सामाजिक बांधिलकी

0
9
जत,संकेत टाइम्स : सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा, जत.ता. जत. जि.सागंली या शाळेतील सह-शिक्षक प्रदिप गोविंद कदम मु.पो.ढालगाव ता.क.महाकांळ जि.सागंली हे दिनाक १ संप्टेबर १९९६ पासुन सह-शिक्षक पदावर कार्यरत होते. तथापि सह-शिक्षक कै.प्रदिप गोविंद कदम यांचे दिनांक १९ संप्टेबर २००१ रोजी आकस्मिक निंधन झाले आहे.

 

तथापि त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी व तीन मुलै असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती प्रियांका प्रदिप कदम यांनी कुटुंबास नोकरीची नितांत गरज आहे व माझ्या मुलाचे शिक्षण पुर्ण झाले असल्याने माझ्या मुलास आपल्या सेस्थेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून लेखी अर्ज केला होता.

 

त्यांची कौटुंबिक पाश्वभुमी व आर्थिक परस्थिती विचारात घेऊन संस्थेचे अध्यक्ष डॉ. वैशाली कैलास सनमडीकर व सचिव डॉ. कैलास उमाजी सनमडीकर यानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय उमाजी सनमडीकर यांच्या विचाराचा वारसा जोपासत त्यांच्या सदर अर्जाचा सहानभुती पुर्वक विचार करून त्यांचे चिरंजिव श्री पृथ्वीराज प्रदिप कदम यांस दिनांक १ ऑगष्ट २०२२ पासून संत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, जत.या शाळेतील रिक्त असलेल्या प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर अनुकंपा खाली नियुक्ती केली असून त्यांच्या कुटुंबास खुप मोठा आधार झाला आहे.सदर कुटुंबाने संस्थेचे आभार मानले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here