Sangli | पतीने मोबाईलचं लॉक उघडून दिलं नाही; पत्नीने घेतला थेट गळफास 

0

सांगली : पतीने मोबाईलचा लॉक उघडून दिला नाही त्यामुळे रागाच्या भरात पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा तालुक्यातल्या शिरटे येथे घडली आहे. मनीषा भगवान खोत, असे या विवाहित महिलेचे नाव आहे. वाळवा तालुक्यातल्या शिरटे येथे राहणाऱ्या भगवान खोत यांची पत्नी मनीषा खोत हिने घरातल्या तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

पतीने मोबाईलचे लॉक उघडून दिले नाही,या क्षुल्लक कारणाने नैराश्या आल्याने तिने ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.शिरटे येथे सामान्य कुटुंबातील भगवान खोत हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते.अल्प शेती असल्याने भगवान खोत साखर कारखान्यात नोकरी करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.

 

Rate Card

शुक्रवारी सकाळी भगवान यांचा मोबाईल पत्नी मनीषा हिने घेतला होता. व मोबाईलचे लॉक काढून द्या, असा हट्ट पती भगवान यांच्याकडे धरू लागली. परंतु भगवान यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर चहा-नाश्ता झाल्यावर काही वेळातच बाजूच्या खोलीमध्ये जाऊन मनीषा खोत हिने साडीच्या सहाय्याने छताच्या तुळाईला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद इस्लामपूर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.