करुणा मुंडेंना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लावला 30 लाखांचा चुना

0
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना अल्पावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून, एका कंपनीत सुमारे 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत संगमनेरातील तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

त्यानुसार भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती, कोंची, पो. निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष अभंग (दोघेही रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे तीनही आरोपी करुणा मुंडेंनी काढलेल्या नव्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.

याबाबत करुणा मुंडे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार (26 ऑगस्ट) रात्री दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संगमनेर मधील या तिघांनी धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या ओळखीतून, त्यांची पत्नी करुणा मुंडे यांचा विश्‍वास संपादन करीत, त्यांना लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीबाबत माहिती दिली.
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.