जत लक्ष्मी डेव्हलपर्समुळे नगरपरिषदेचे वार्षिक उत्पन्न अडीच कोटीने वाढणार ; राजेंद्र कोळेकर | सर्व परवानग्या,व्यवहार पारदर्शी

0
जत,संकेत टाइम्स : जत येथील डेव्हलपर्स हा प्रोजेक्ट पुर्ण झाल्यानंतर नगरपरिषदेचे तब्बल अडीच कोटींचे वार्षिक उत्पन्न वाढणार आहे.सर्व प्रक्रिया परवानग्या रितसर घेऊनच प्लॉटची विक्री सुरू आहे.या प्रोजेक्ट बद्दल पसरवलेली माहिती चुकीची व दिशाभूल करणारी आहे.सर्व पारदर्शक व्यवहार आम्ही करत आहोत.जतसह सांगोला येथेही लक्ष्मी डेव्हलपर्सचा मोठा प्रोजेक्ट सुरू आहे,अशी माहिती पोजेक्टचे अध्यक्ष राजेंद्र कोळेकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
राजेंद्र कोळेकर म्हणाले,जत शहर सुधारण्यासाठी मोलाचे योगदान देणारे श्री लक्ष्मी डेव्हलपर्सची ओळख येत्या काळात असले.सर्व सुख सुविधा असणारा हा आमचा पोजेक्ट सुरू आहे.येथे नगरपरिषेदला कोट्यावधीचा फायदातर होणार आहे,त्याशिवाय येथे रहिवाशी असणाऱ्या नागरिकांना शहराच्या धर्तीवर सर्व सोयी मिळणार आहेत.सर्वसामान्य नागरिकांना व अनेक गुंतवणूकदारांना हे प्लॉट त्यांच्या बजेटमध्ये मिळत आहेत,ही वस्तुस्थिती आहे.मात्र काहीकडून जत येथील श्री लक्ष्मी डेव्हलपर्सच्या बाबतीत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे.गेल्या दहा वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय चोख व प्रामाणिकपणे करत आहे.

 

आतापर्यंत कोणी गैरसमजातून असे प्रकार केले असतील तर ठीक आहे.मात्र चुकीच्या पद्धतीने यापुढील काळात कोणी बदनामी किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास अशावर कायदेशीर मानहाणीचा अथवा खंडणीचा गुन्हा दाखल करू,असेही श्री लक्ष्मी डेव्हलपर्सचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोळेकर यांनी सांगितले.यावेळी पै.सचिन बोरकर,रामदास दोलतोडे उपस्थित होते.
Rate Card
राजेंद्र कोळेकर पुढे म्हणाले की,जतमधील श्री लक्ष्मी डेव्हलपर्सच्या वतीने प्लॉटच्या सुविधेसाठी जत नगरपरिषदेला 13 लाख रुपये तर महाराष्ट्र शासनाकडे 33 लाख विकास शुल्क भरले आहे.भविष्यात सर्व प्लॉटच्या विक्रीनंतर जत नगरपरिषदेला वर्षाला अडीच कोटी रुपये विविध कराच्या माध्यमातून मिळणार आहेत.तसेच या पार्कसाठी अंडरग्राउंड गटार व्यवस्था करण्यात आली आहे.पाण्यासाठी एकूण सहा बोअरवेल घेतल्या आहेत. तर दोन महिन्यांपूर्वी 30 एकर जागेपैकी 12 एकर क्षेत्र जत नगरपरिषदेकडे वर्ग केले आहे.यामध्ये रस्ते,ओपन स्पेस आदींचा समावेश आहे.या प्रकल्पाला सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या आहेत. त्यामुळे प्लॉट धारकांनी अथवा गुंतवणूक करणाऱ्यानी कसलीही चिंता करण्याची गरज नाही.

 

शिवाय जिल्हाधिकारी किंवा इतर माध्यमातून आमच्या या प्रकल्पा बाबतची माहिती कोणीही माहिती अधिकाराखाली घेऊ शकता.वास्तविक या प्रकल्पाबाबत सर्व प्रकारच्या परवानग्या पुणे, मुंबई येथून घेतल्या आहेत.सर्व कागदपत्रे स्वच्छ व टायटल क्लिअर आहेत,असेही कोळेकर म्हणाले.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.