जत,संकेत टाइम्स : शहरातील नारू मळा येथील सुजलॉन कंपनीची विद्युत वहिनी तार दि. ३१ मे २०२० रोजी अवकाळी पाऊस व वारा यामुळे पोल वरील गार्डिंग तुटून शेडवर पडली होती. याची माहिती स्थानिक नागरीकांनी दूरध्वनीवरून माजी नगरसेवक परशुराम मोरे व उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवार यांना दिली. यावेळी जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शेळके व तत्कालीन तहसीलदार सचिन पाटील यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन, पाहणी केली.
यावेळी तत्कालीन तहसीलदार सचिन पाटील यांनी आदेश काढत, सुझलॉन ग्लोबल सर्विसेस लि. विद्युत वाहिनीने दुरुस्तीचे काम वाकलेल्या पोलला सपोर्ट पोल देवून तात्काळ वाहणी सुरू करणेत यावी. अंडरग्राऊड केबलचे काम पुर्ण होईपर्यंत सदर पोलमुळे जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी व ऑक्टोबर २०२० च्या पूर्वी पूर्ण करावे. असा आदेश दि. ३१ मे २०२० रोजी देऊन आज अडीच वर्षे उलटून गेले तरी कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. फक्त १०० मीटरचे साहित्य उपलब्ध असल्याचे तेथील शेतकऱ्यांना सांगितले.
शेतकऱ्यांना आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार साहेबांनी जेवढं काम सांगितलं आहे. तेवढं काम पूर्ण करा असा इशारा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर एक वर्ष उलटून गेले पण काहीही काम पूर्ण झाले नाही. सदरचे काम एका महिन्यात पूर्ण न केल्यास सुझलॉन ग्लोबल सर्विसेस लि. च्या ऑफिस ला टाळे ठोकू असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
अनुसूचित प्रकार घडू नये ; माजी नगरसेवक मोरेजत शहरातील पाटील मळा याठिकाणी काल जो अनुसूचित प्रकार घडत यासाठी कंपनीने तात्काळ काम सुरू करावे अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा परशुराम मोरे यांनी दिला आहे.