शेतकरी सुविधा केंद्र सांगली येथे सुरु
सांगली : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड चे प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकरी सुविधा केंद्र एस.टी. कॉलनी रोड, विश्रामबाग सांगली येथे दि. 26 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आले. या सुविधा केंद्राचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. या शेतकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन व तक्रारींचे निरसन करण्यात येईल.
शेतकरी सुविधा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी तंत्र अधिकारी एम. एस.मोहिते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विजय यादव, आबाजी माने, जिल्हा समन्वयक संदीप पाटील व तालुका समन्वयक उपस्थित होते.

