माडग्याळ,संकेत टाइम्स : महाआवास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा अंतर्गत घेतलेल्या महा आवास स्पर्धेत जाडरबोबलाद ग्रामपंचायतीला जत तालुक्यातून प्रथम क्रंमाक मिळाल्याची माहिती माजी सभापती तमाणगौंडा रवी पाटील यांनी दिली.
ग्रामपंचायत जाडरबोबलादवर रवीपाटील गटाची सत्ता आहे.त्यांच्या मातोश्री लोकनियुक्त सरपंच आहेत.
ग्रामपंचायतीने गेल्या ३ वर्षात तालुक्यात कोट्यवधीचा निधी खेचून आणून अनेक विकास कामे केली आहेत. गाव स्वच्छ व सुंदर केले आहे. विविध रस्ते, सुंदर शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणीपुरवठा , सुंदर ग्रामपंचायत, गावात संपूर्ण पेव्हर ब्लॉक यांसह विविध योजना राबवण्यात आल्याचे तमाणगौंडा रवि पाटील यांनी सांगितले.
केंद्र,राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत गावाने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचे त्यांनी आभर मानले.