जत तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा अव्वल; भौतिक सुविधांचा अभाव | शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू | – प्रकाशराव जमदाडे

0

जत येथे शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कटयारे , गटविकास अधिकारी दिनकर खरात, श्रीपाद जोशी आदी उपस्थित होते.

 

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थी यांच्यात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. शिक्षक हे देशाची भावी पिढी घडवणारे क्रांतिकारक आहेत. सर्वच शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत. विविध उपक्रम व उल्लेखनीय कार्य करत असलेल्या शिक्षकांचा सर्व्हे करून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. शिक्षण क्षेत्रातील उणिवाबाबत वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. प्राथ. शिक्षकाच्या २७६ रिक्त पदाबाबत व धोकादायक वर्ग खोल्याच्या संदर्भात खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी केले.

 

प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशनच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शाळेतील उल्लेखनीय कार्य केलेल्या ६० शिक्षकांना प्रशस्तीपत्र, सिल्ड, आंब्याचे रोपटे, हार, श्रीफळ शाल देऊन आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बोलत होते. या सोहळ्यास
तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्रीपाद जोशी ,प्रांताधिकारी जोगेंद्र कटयारे, गटविकास अधिकारी दिनकर खरात, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे,संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, दिलीप वाघमोडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे, उपनगराध्यक्ष आप्पासो पवार, जत सोसायटीचे अध्यक्ष मोहन उर्फ भैया कुलकर्णी,माजी सभापती मीनाक्षी अक्की, रमेश बिराजदार,सुनील पाटील,मारुती जमदाडे, दिलीप वाघमोडे, रामन्ना जीवनावर, आण्णासाहेब कोडग, योगेश व्हनमाने , अभय जमदाडे,प्रमोद जमदाडे आदी उपस्थित होते.

 

जमदाडे पुढे म्हणाले, शिक्षकांना असैक्षणिक कामाचा अतिरिक्त भार दिला जात आहे. या कामातून मुक्तता मिळावी. ज्ञानार्जन करताना शिक्षकांनी कोणत्याही पद्धतीची कसूर न राखता देशाच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या विद्यार्थीची संस्कारक्षम पिढी घडवण्याचं कार्य करावं. भविष्यात देखील शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने जत पॅटर्न असा नावलौकिक मिळेल. अशा दृष्टीने सर्वच घटकांनी प्रयत्न केले पाहिजेत.

 

 

पर्यावरणपूरक संदेश.

Rate Card

फाउंडेशनच्या माध्यमातून देशाच्या स्वतंत्राच्या अमृतमहोत्सवाच्या औचित्य साधून स्वतंत्र सैनिकांच्या वीर पत्नींचा सन्मान, शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांना मदत, अशी लोकउपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आंब्याचे रोपटे देऊन पर्यावरण पूरक संदेश दिला आहे तसेच हे रोपटे जगवले पाहिजे असेही सांगितले आहे .

 

जमदाडे यांची विधानसभेसाठी पायाभरणी चर्चा.
जमदाडे सर्व क्षेत्रातील घटकाशी निगडित असल्याने त्यांचा संपर्क चांगला आहे. तालुक्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे.शिक्षक दिनाचे औचित्य साधत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण केले.यावेळी तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान त्यांच्या या कामाची चुणूक दिसून आली. जमदाडे यांची मिशन विधानसभा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पायाभरणी सुरू असल्याची चर्चा सुरू होती.

 

संघटन कौशल्य, तालुक्यातील प्रत्येक प्रश्नाची जाण असल्याने मिळालेल्या पदाचा चांगल्या पद्धतीने वापर करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितली जाते. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अभ्यासू व्यक्तीची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.