डफळापूर,संकेत टाइम्स : येथील जेष्ठ हॉटेल व्यवसायिक महानिंग सि.महाजन यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.अगदी किचकट असलेल्या हॉटेल व्यवसायातील यशस्वी उद्योजक म्हणून महानिंग तात्या प्रसिद्ध होते.
महानिंग तात्या यांनी पोटाची खळगी भराण्यासाठी 35 वर्षापुर्वी सुरू केलेला हॉटेल व्यवसायाला अपार परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर प्रसिद्ध केले होते.या व्यवसायात महाजन ब्रँड म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता.व्यवसायात यश आणि अपयश हे असतंच. पण अपयशानं डगमगून न जाता नव्या जिद्दीनं पुन्हा शून्यातून नवं विश्व उभारता येतं, हे महानिंग महाजन तात्या यांनी आपल्या यशस्वी व्यवसायानं सिध्दही करुन दाखविले होते.
डफळापूर येथील यशस्वी उद्योजक असलेल्या महाजन कुंटुबातील तात्यांच्या जाण्याने पहिला तारा निखळला आहे.त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले,दोन मुली,पुतने,सुना,नांतवडे असा मोठा परिवार आहे.उद्या गुरूवार ता.8 संप्टेबरला सकाळी 8.00 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.