तासगाव : हिसडा मारून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली,या चोरट्याकडून तीन चोऱ्याचा छडा लागला आहे.सुनिल राजू खुडे वय १९,रा.पाथर्डी,(जि.अहमदनगर),राम बबन मासाळकर वय २२ रा.पाथर्डी(जि.अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
तासगाव येथे रथोत्सव बघण्यासाठी आलेले गजानन राऊत,माणिक चव्हाण यांच्या गळ्याला हिसडा मारून दोन चैनची चोरी करण्यात आली होती.त्याअनुषंगाने तपास करत असताना पोलीसांना सुनिल खुडे,राम मासाळकर यांनी चोरीतील चैन विकण्यासाठी तासगाव सराफ कट्टा येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना खबऱ्याकडून मिळाली होती.
त्या आधारे सापळा लावून संशयित दोघा चोरट्यांना पकडताच,त्यांच्याकडे १५ ग्रँमची ७० हजार रूपये व ८ ग्रँमची ४० हजार रूपयाच्या दोन चोरीतील चैन मिळून आल्या.त्यांनी तासगाव रथोत्सव सोहळ्यात या चैन चोरल्याचे कबूल केले आहे.संशयित दोघांना अटक करण्यात आली आहे.पोलीस निरिक्षक संजीव झाडे यांच्या पथकांनी हि कारवाई केली आहे.