जागतिक साक्षरता दिन

0
17
आज ८ सप्टेंबर, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. मानवी समाज सुसंस्कृत बनून  समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी. निरक्षर लोकांना साक्षरतेची संधी मिळावी यासाठी राष्ट्रकुलच्या  ‘युनेस्को’ या संघटनेने १९६५ साली जागतिक पातळीवर साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा केली व त्याच्या पुढच्या वर्षापासून ८ सप्टेंबरला जगभर ती प्रथा रूढ झाली.

 

आज इतक्या वर्षांनंतरही युनेस्कोने सुरू केलेल्या जागतिक साक्षरता दिनाला जगभर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे  माणसाला दैनिक जीवनाशी निगडित बाबीविषयी लिहिता वाचता येणे, मानवी जीवनातील घडामोडींचे विश्लेषण करता येणे व वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वतःच्या व समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे. शिक्षणाचे महत्व कोणाला नाही? मानवी कल्याणासाठी शिक्षण अतिशय महत्वाचे आहे मात्र केवळ शिक्षण देणे म्हणजेच साक्षरता नव्हे तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तिशाली मार्ग आहे.

 

 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here