वृत्तपत्र विक्रेत्यांनी केला कामगार मंत्र्यांचा सत्कार | – वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाबाबत लवचरच बैठक घेण्याचे आश्वासन

0
सांगली : वृत्तपत्र विक्रेत्या कल्याणकारी मंडळासाठी यापूर्वी झालेल्या कामाची माहिती घेऊन लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या वतीने कामगार मंत्री पदी निवड झाल्याबद्दल  डॉ. खाडे यांचा सत्कार राज्य सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडे राज्य नेते मारुती नवलाई जिल्हा संघटक प्रशांत जगताप उपस्थित होते.
डाॅ.खाडे यांना यावेळी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाबाबत निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हंटले आहे,  महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही राज्यातील तीन लाख वृत्तपत्र विक्रेत्यांचे नेतृत्व करणारी, त्याच्या प्रश्नांसाठी झगडणारी एकमेव शिखर संघटना आहे. मागील बारा वर्षाहून अधिक काळ राज्यसंघटना वृत्तपत्र विक्रेत्यांकरीता कल्याणकारी मंडळ व्हावे म्हणून प्रयत्नशिल आहे. त्याचाच परीणाम म्हणून 2019 मध्ये  भाजपा आमदार संजयजी केळकर (ठाणे) यांच्या प्रयत्नाने व तत्कालीन कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे शासकीय आदेशाने वृत्तपत्र विक्रेत्यांकरीता अभ्यास समिती स्थापन करण्यांत आली होती. त्याचा अहवाल दि. 17/11/2019 रोजी राज्यसरकारकडे देण्यांत आलेला आहे.
कोरोना माहामारी व इतर कारणाने त्या अहवालाचे रुपांतर कल्याणकारी मंडळांत झालेले नाही. तरी आपणांस विनंती आहे कि, सदर अहवाल कार्यान्वीत करुण कल्याणकारी मंडळांत रुपांतर करावे याबाबत मा. कामगार मंत्री म्हणून आपण तातडीने आपल्या अध्यक्षतेखाली, आमदार संजय केळकर ठाणे संबधित सर्व अधिकारी, आमचे संघटना पदाधिकारी यांचेसोबत बैठकीचे आयोजन करावे.आमदार श्री केळकर यांच्याशी चर्चा करु, माहीती घेऊ लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन डाॅ.खाडे यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिले. यावेळी विशाल रासनकर, सचिन माळी, श्रीपाद उर्फ पिंटू पाटील, राजेंद्र पोटे, दादासो गुरव, निलेश कोष्टी, पोपट मंडले, सुरेश घोडके,विनायक तांबोळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.