बेवणूरमध्ये तूफान पाऊस,ओढा दुतोंडी

0
दुधेभावी : बेवणूर ता.जत येथे तुफान पाऊस पडल्याने बेवनूर-दुधेभावी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे.
Rate Card
बेवणूर येथील म्हसोबा मंदिर हे तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दुधेभावी व  बेवणूरचा संपर्क तुटला आहे.येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे,तसेच गावकऱ्यांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

 

परिसरात 4 ते 5 दिवस पाऊस थांबत नसल्याने या भागातील शेतकरी वर्ग चिंतेत आहेत.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.