नवी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची | – मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी

0

 

सांगली : मॉडेल स्कूल अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना मुलभूत सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे नवीन पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. आता आपण जिल्ह्यात शिक्षण क्रांती राबवू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले .

 

 

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण मुख्यकार्यकारी डुडी यांच्या हस्ते झाले. वसंतदादा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव ,राहुल गावडे डॉ. तानाजी लोखंडे आणि संदीप यादव तसेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता अरुण पाटील आणि राजेंद्र भोई यांच्यासह पुरस्कार प्राप्त शिक्षक अमोल सातपुते ,दीपक दीपक कुमार शिवाजी कांबळे ,दिलीप मारोती वाघमारे,अजय काळे ,धनाजी साळुंखे ,फरिदा मकानदार ,उत्तम कदम ,विजय झेंडे ,जनार्दन ढाणे आदी उपस्थित होते.

 

डुडी म्हणाले,शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षक पुरस्कारासाठी २१ प्रस्ताव आले होते.सर्वच शिक्षक पुरस्कारासाठी पात्र होते मात्र गुणांनीनुक्रमे दहा जणांची निवड केली. पुढच्या वर्षी आणखी शिक्षकांनी प्रस्ताव घ्यावेत.पारदर्शीपणाने पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले,माझी शाळा आदर्श शाळा आदर्श शाळा म्हणजे मॉडेल स्कूल उपक्रमांमध्ये १७१शाळांना सुविधा दिल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात १४१ शाळांना सुविधा देण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक गावात एक मॉडेल स्कूल करण्याचा प्रयत्न आहे .आता शिक्षकांची जबाबदारी आहे.

 

प्रथम संस्थेने डिसेंबरमध्ये केलेल्या पहिल्या सर्वेपेक्षा जुलैमध्ये केलेल्या दुसऱ्या सर्वेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत १५ टक्के वाढ झाली आहे. शिक्षकांनी ठरवले तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देता येते . जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साडेसहा हजार विद्यार्थी वाढले आहेत.म्हणजे जिल्हा जिल्हा परिषद शाळांवरचा विश्वास वाढल्याचे दिसते ,असे गुडी म्हणाले.

 

शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर शिकवताना केला जात आहे .मात्र काही शाळांमध्ये हे साहित्य तसेच पडून असल्याचे दिसते वापर केला जावा. राज्य शासनाने स्वीकारलेलली आनंददायी शिक्षण हे आपल्याच शिक्षकाने तयार केले आहे.तो चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने राबवावा आपण पुढची पिढी घडवतोय हे लक्षात ठेवा असे ते म्हणाले .

Rate Card

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्त आयोगातून शिक्षक नेमण्याची नियोजन करण्यात येत आहे.असे त्यांनी सांगितले.शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अनेक पिढ्या, कुटुंबे घडविण्याचे काम शिक्षक करतात मॉडेल स्कूल ,आनंददायी शिक्षणाचे कार्यक्रम हे सांगलीच्या शिक्षकांनी तयार केले आहेत ही अभिमानास्पद बाब आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी आपली आहे, असे ते म्हणाले.

 

यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने अजय काळे,फरीदा मकानदार,दिलीप वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे तसेच अविनाश गुरव , अमोल शिंदे संचालक, शिक्षक उपस्थित होते

पुरस्कार म्हणजे पालक, विद्यार्थ्यांचा सन्मान : वाघमारे

मनोगत व्यक्त करताना शिक्षक दिलीप वाघमारे हे भावनावश झाले.जत तालुक्यातील पांडोझरी येथील बाबरवस्ती या दुर्गम भागातील शाळेत ते काम करत आहेत.या ठिकाणी काम करताना पालकांची दारु तंबाखू सोडवण्यासाठी मुलांनी केलेले प्रयत्न आणि यातून ४०कुटुंबे व्यसन मुक्त झाली.वृक्षरोपण संगोपन,अनेक उपक्रम राबविले यशस्वी केले. हा पुरस्कार म्हणजे पालक आणि मुलांचा सन्मान आहे असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.