देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे मोठे योगदान ; जतेत गौरव

0
प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशन चा उपक्रम
जत,संकेत टाइम्स : देशाच्या जडणघडणीत अभियंताचे मोठे योगदान आहे देशाच्या विकासाला अभियंताची गरज आहे आपल्या राष्ट्राची प्रगती व विकास हे अभियंताच्या प्रतिभावान बुद्धी शिवाय शक्य नाही. तालुक्यातील अभियंता म्हणून ज्यांनी अतिशय काम चांगले केले आहे त्यांना प्रकाशराव जमदाडे फाउंडेशनच्या वतीने आदर्श अभियंता या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी केले.
जत येथे भारतरत्न एम विश्वेश्वरय्या यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशन च्या वतीने तालुक्यातील वीस उत्कृष्ट अभियंतांना शाल श्रीफळ सन्मानपत्र व आंब्याचं रोप देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी जमदाडे बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, गटविकास अधिकारी दिनकर खरात, सार्वजनिक बांधकामाचे उपविभागीय अधिकारी एम. एल. माळी, महावितरणचे उपअभियंता आशिष  खेडेकर, महावितरणचे जत उपअभियंता इंगळे, सिद्धू शिरसाड, विठ्ठल निकम, जत सोसायटीचे अध्यक्ष मोहन उर्फ भैया कुलकर्णी, योगेश व्हनमाने , इंजि. प्रमोद जमदाडे, अभय जमदाडे, पी.पी. शिंदे, किशोर निकम आदी उपस्थित होते.
जमदाडे म्हणाले, तालुक्यात रस्ते पूल धरण बांधणे यात अभियंताचे योगदान आहे एकंदरीत विकासामध्ये अभियंताचा हातभार आहे. जलस्रोतांचा उपयोग बंधारे फुल इमारती यांचे यशस्वी डिझाईन बांधकाम, व सिंचन पाण्याची योजना राबवण्यासाठी ते काम अभियंता मार्फत होते आणि त्यांच्या कौशल्याची देशाला गरज आहे. सर्व अभियंतांनी प्रेरणास्त्रोत म्हणून भारतरत्न एम विश्वेश्वरय्या त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी असेही आवाहन जमदाडे यांनी केले.
जत ; तालुक्यातील अभियांत्रिकी क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या अभियंताना सन्मानपत्र, शिल्ड ,शाल श्रीफळ देऊन सन्मानित करताना जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे व मान्यवर
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.