अंगणवाडी पोषण आहारात मिक्सरचे ब्लेड | कवठेमहांकाळमध्ये चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ

0
 कवठेमहांकाळ : लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अंगणवाडीच्या रूपाने त्यांना पोषण आहार आणि प्राथमिक ज्ञान दिले जाते.लहान मुलांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या अंगणवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मिक्सरचे ब्लेड आढळून आल्याने  कवठे महांकाळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Rate Card
             कवठे महांकाळ येथील सगरे कोठावळे गल्लीत असलेल्या अंगणवाडीमध्ये गुरुवारी दिनांक १५ रोजी लहान मुलांना खायला दिलेल्या पोषण आहारात मिक्सरचे ब्लेड आढळून आले आहेत.ज्या लहान मुलीच्या डब्यात हे ब्लेड आढळून आले त्या चिमुकलीची आई तिथे उपस्थित असल्याने पुढील अनर्थ टळला.या अगोदर देखील पोषण आहारात खडे,गंजलेल्या लोखंडाचे तुकडे आढळून आले आहेत.

 

याबाबत वेळोवेळी मुलांच्या पालकांनी तक्रार करून देखील अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांकडून ही बाब गांभीर्यपूर्वक घेतली गेली नाही.          चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि आळशीवृत्ती तसेच वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी विरोधात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी पालक गेले असता पालकांना दमदाटी करून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे केविलवाणे प्रयत्न त्यांच्याकडून वेळोवेळी झाले आहेत.

 

                       या सर्व प्रकारची गंभीर दखल घेत आळशीवृत्ती आणि वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत काम करणाऱ्या आणि मुलांच्या जिवांशी खेळणाऱ्या अंगणवाडीतील कर्मचारी,प्रशासनातील अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.