महिला सबलीकरण काळाची गरज : – विजया कुंभार

0
जत: जत येथील राजे रामराव महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, विद्यार्थी विकास समिती यांच्या विद्यमाने आयोजित दहा दिवसीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. “महिला सबलीकरण काळाची गरज” या विषयावर मार्गदर्शनपर आठवे पुष्प पो.कॉ.सौ.विजया कुंभार  यांनी गुंफले यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
आज महिलाची संख्या पुरुषाच्या बरोबरीने वाढत आहे, परंतु आज महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक असो मानसिक, शारीरिक किंवा हक्काची लढाई. अशावेळी विद्यार्थिनी दशेतच ही माहिती असेल तर त्या प्रबळपणे आपली मते मांडू शकतात तसेच हक्क मागू शकतात असे मत पो.कॉ.सौ. विजया कुंभार यांनी मांडले, त्यांनी विद्यार्थिनींना छेडछाड झाल्यास मौन न राहता त्यावर आपला आवाज बुलंद करावा असे आवाहन केले.

 

त्यांनी अनेक कायद्याची माहिती देऊन जत पोलीस यंत्रणा व निर्भया पथक कायम त्यांच्या पाठीशी राहील असे आश्वासन विद्यार्थ्यांनीना दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संगीता देशमुख यांनी केले. राजे रामराव महाविद्यालयाच्या महिला सबलीकरण कक्षा विषयी माहिती दिली तसेच या विभागातर्फे विद्यार्थिनींना वेगवेगळ्या महिला विषय घेण्यात येणाऱ्या प्रश्नमंजुषा,  व्याख्यानमाला, कार्यशाळा तसेच विविध कार्यक्रमात सहभागी होण्यास आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.  सतीश पडोळकर यांनी केले तसेच आभार डॉ. निशा राणी देसाई यांनी केले या कार्यक्रमास डॉ. डहाळके,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समनव्यक डॉ.शिवाजी कुलाल,कु.जयश्री बाळीकाई तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.