नुतन फार्मसी कॉलेजमध्ये सुविधा केंद्रास मान्यता

0
कवठेमहाकांळ : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण देण्यात सांगली जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील नुतन कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्षामार्फत सुविधा केंद्रास रितसर मान्यता मिळाली असल्याची माहिती, प्राचार्य अमोल पाटील यांनी दिली.

 

Rate Card
                     नरसिंहगाव येथे राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्थेच्या वतीने नुतन फार्मसी कॉलेज सुरु आहे सांगली जिल्ह्यातील व ईतर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देणारे महत्वाचे केंद्र म्हणून नुतन कॉलेजकडे पहिले जाते विद्यार्थी वर्गाच्या सोयीसाठी प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी सुविधा केंद्र असणे गरजेचे आहे. त्यामुळे संस्थेच्या वतीने सुविधा केंद्रासाठी पाठपुरवठा केला होता, नूतन फार्मसी कॉलेजमध्ये असलेल्या विविध सुविधा,मार्गदर्शक प्राध्यापक व गरज लक्ष्यात ठेऊन महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्षा मार्फत सुविधा केंद्रास रीतसर मान्यता देण्यात आली आहे.

 

राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्थेच्या अध्यक्ष्या डॉ नुतन माळी, सेक्रेटरी डॉ रामलिंग माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. अमोल पाटील,उपप्राचार्य प्रमोद चिक्कोडी,विभागप्रमुख प्रा. शरद कांबळे यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्षामार्फत सुविधा केंद्रास रितसर  मान्यता मिळाली आहे फार्मसी विभागाच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षातील प्रवेशासाठी नोंदणी करणे तसेच पुष्टीकरण करणेस परवानगी मिळाली असल्याने विद्यार्थी वर्गाची सोय झाली आहे.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी सोयीचे झाले आहे. सुविधा केंद्रास रितसर मान्यता  मिळण्यासाठी प्रा. सुहास माने, सुजित वाघमारे,शरद कांबळे संदीप शिंत्रे विजय पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले, असल्याचे प्राचार्य डॉ अमोल पाटील यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी फार्मसी प्रवेशासाठी नुतन कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ अमोल पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.