घोणस आळीचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाय करावेत

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील शेतकऱ्यांना धोकादायक ठरत असलेल्या घोणस अळी बाबत कृषी विभाग दक्ष नसल्याने धोका वाढला आहे.या आळीचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाय कराव्यात,अशी मागणी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.

 

 

साबळे म्हणाले,चालू वर्षात जत तालुक्यात तसेच सांगली जिल्ह्यात सर्वत्र चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाण्याचा साठा पुरेसा झाला असून सर्वत्र पीक सुद्धा जोमाने उभे असून अशा परिस्थितीत शेतकरी यांच्यावर वेगवेगळे दोन संकटे उभे ठाकले असून शेतीला पूरक असणाऱ्या पशुधन पालकांच्या लंपी स्किन सारख्या आजाराने सावट आल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला असून पशुसंवर्धन विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग आणि तालुका विस्ताराने फार मोठा त्याचबरोबर जनावरांची संख्या भरपूर असल्याने पशू संवर्धन विभागाकडील कर्मचारी हे लसीकरण करण्यास कमी पडत आहेत. त्यामुळे पशुधनावर उदरनिर्वाह चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे मोठे संकष्ट उभे ठाकले असून अशातच भर की काय म्हणून पिकावरती घोणस आळी आली आहे.

 

ही आळी अंगावरून नुसती फिरली किंवा चावल्यास माणूसास वीषबाधा होऊ शकते.औषध उपचार वेळेत न झाल्यास माणूस दगावू शकतो इतकी महाभयंकर विषारी आहे त्या अळीचा रंग गेल्यासारखं  असल्यामुळे तुरी,ऊस, मका इत्यादी पिकाच्या पानावरती बसलेली  सहजासहजी शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे उसातून तुरीतून फिरताना ही आळी स्पर्श होऊन चावू शकते. शेतकऱ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो.
साबळे म्हणाले, आळीला रोकण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारची जनजागृती किंवा लोकांना सूचना केलेल्या दिसून येत नाहीत, घोणस आळी संदर्भात कृषी विभाग गांभिर्याने घेत नसून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

 

तालुक्यातील कृषी खात्यातील अधिकारी यांनी प्रत्यक्ष बांधावरती जाऊन पाहणे करून या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक असणारी औषध उपचार यंत्रणा सर्व शेतकऱ्यांना मोफत देऊन सहकार्य करावे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इडियाच्या तर्फे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने कृषी विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल,असा इशारा रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी दिला आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.