जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार 

0
बालगाव(संजय ऐदोळे) : सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.सोसायटी, बँकेच्या माध्यमातून जत तालुक्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज मिळावे व थकबाकीची वसुली व्हावी या संदर्भात
सातत्याने सोसायटी बँक शाखांना आम्ही भेट देत आहोत,अशी माहिती जिल्हा बँक संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी दिली.

 

नुकतीच जमदाडे यांनी उमदी,बालगाव, बोर्गी, करजगी, भिवर्गी, दरीबडची, सिद्धनाथ, जाल्याळ खुर्द या सोसायट्यांना भेट देऊन चर्चा केली.
जमदाडे म्हणाले,अनेक वर्षे थकीत असलेल्या शेतकऱ्यांना व्याजात सुट देण्यासाठी बँकेने ओटीएस योजना आणली आहे,यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत.सोसायटी स्तरावर असणाऱ्या अडचणी सोडविल्या जात आहेत.शेतकऱ्यांनी बँकेच्या योजनाचा लाभ घ्यावा,असे आवाहनही जमदाडे यांनी केले.

 

 

यावेळी संचालक मन्सूर खतीब, बँकेचे कर्ज विभाग प्रमुख आबा माने,श्री.मुलाणी,जतचे तालुकाधिकारी श्री. नाटेकर, वसुली अधिकारी राजू कोळी उपस्थित होते.

 

 

सोसायटी ना भेटी देत असताना शेतकरी सभासदांनी समाधान व्यक्त केले.घेतलेल्या कर्जाची परतफेड करून बँक आणि सोसायटी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. सोसायटीकडून उपस्थित मान्यवरांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला.शेतकऱ्यांच्या या प्रेमामुळे भारावून गेलो आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणेसाठी बँकेला भाग पाडू अशी ग्वाही जमदाडे यांनी दिली.या बैठकीला अँड.चन्नाप्पा होर्तिकर ,निवृत्ती शिंदे , शिवरसिद्ध दुधगी, अप्पू पाटील,बिळांनसिद्ध बिराजदार, बसवराज चौगुले, रामगौंड बिराजदार,सुभाष पाटील, संभाजी चौगुले,सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन ,सदस्य व शेतकरी सभासद उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.