मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने बहुसंख्य नागरिकांना रेशन सोडा, असा आदेश दिला आहे. दंड आणि शिक्षेची भीती दाखवून गरजूंना स्वस्त धान्यापासून वंचित ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
हा जनविरोधी आदेश मागे घ्या, प्रतिवर्षी पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वांना रेशनवर स्वस्त धान्य उपलब्ध करून द्या, केशरी कार्ड धारकांना नियमित धान्य मिळाले पाहिजे, धान्यामध्ये डाळी, तेल, साखर यांचा समावेश करावा, ज्या गरीब कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही त्यांना नवीन रेशनकार्ड देण्यात यावे, अशा मागण्या केल्या आहेत. यावेळी रेश्मा शेख, रामेश्वरी चव्हाण, दिपाली छत्रे, अनिता संकपाळ, मनीषा माने, रुपाली पवार उपस्थित होते.