ज्योत आणताना उमदीच्या तरुणाचा गाडीतून तोल जाऊन पडल्याने मृत्यू
उमदी,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील उमदी येथील करण्णाप्पा दऱ्याप्पा ऐवळे ( वय २२, उमदी, ता. जत) हा तुळजापूर येथून ज्योत घेऊन येत असताना गाडीतून तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.२६) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटक येथील हलसंगी फाट्यानजीक घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तुळजापूर येथून आंबामातेची ज्योत आणत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सगळे तरुण ज्योत आणण्यासाठी गेले होते.यात करणाप्पा ऐवळे या तरूणाचा ही सहभागी होता.

ज्योत घेऊन परत उमदीकडे येत असताना कर्नाटकातील हालसंगी फाट्यानजीक गाडीतून करणाप्पा याचा तोल जाऊन तो चाकाखाली चिरडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. उमदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.