कमल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला एनएबीएच संस्थेतर्फे ‘उत्कृष्ट सेवेचे प्रमाणपत्र’

0
Post Views : 10 views
जत,संकेत टाइम्स : गेली २४ वर्ष सेवेत कार्यरत असणारे  कमल ऑर्थोपेडिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ने आपल्या सेवाभावातून सर्वत्र एक वेगळी ओळख निर्माण कैली आहे.डॉ. कैलास सनमडीकर व वैशाली सनमडीकर यांच्या या सेवाकार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेऊन नॅशनल अँकॉडरेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँन्ड हेल्थ केअर (NABH)या संस्थेतर्फे  ‘उत्कृष्ट सेवेचे प्रमाणपत्र हॉस्पिटलास देण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्राने हॉस्पिटलच्या कार्याचा गौरवच केला गेला आहे.
कमल ऑर्थोपेडिक हॉस्पिटल हे, एक जत मधील नामांकित हॉस्पिटल आहे.
या हॉस्पिटलमधील रुग्णांची निगा, राष्ट्रीय हॉस्पिटलच्या नियमावलीचे पालन, तात्काळ उपचार, नर्स, सिस्टर, कंपाऊंडर्स याचे रुग्णाप्रती असणारी आत्मयिता,आपले पणाची भावना, उपचार पध्दत, स्वच्छता व अत्याधुनिकता यांची एनएबीएच संस्थेतर्फे उच्चस्तरीय समितीतर्फे परिक्षण करून कॉन्स्टीट्यूट बोर्ड ऑफ क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे बहुमानाचे प्रमाणपत्रास कमल हॉस्पिटलास पात्र ठरविण्यात आले आहे, २४ तास रुग्ण सेवेत असणारे डॉ. कैलास सनमडीकर यांनी गेली २४ वर्षे अथक परिश्रमातून हॉस्पिटलची उभारणी केली आहे. जतच नव्हे तर तालुक्या बाहेरील मंगळवेढा, सांगोला, कर्नाटकातील अथणी व विजयपुर जिल्ह्यात प्रमुख अस्थितज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

 

Rate Card
डॉ.कैलास हे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे चिरजिंव आहेत.वडिलांच्याच सेवाभावाचा आदर्श जपत सोलापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. ही. वैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यानंतर डॉ.डि.ओर्थो ही अस्थि उपचारातील पदवी मिरज येथे घेऊन एक अस्थितज्ञ डॉक्टर म्हणून सेवेस सुरुवात केली. आपल्या ज्ञानाच्या जोरावर अनेक यांनी डि.ओर्थो ही अस्थि उपचारातील पदवी मिरज येथे. घेऊन एक अस्थितज्ञ डॉक्टर “अस्थिरोग व रुग्णांवर उपचार ‘करून ‘हाडांचा उत्कृष्ठ डॉक्टर’ अशी ख्याती डॉ. कैलास सनमडीकर  यांची ओळख निर्माण झाली आहे.

 

आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर योग्य उपचार, योग्य वेळेत आणि योग्य पध्दतीने व्हावे यासाठी अत्याधुनिक वैद्यकिय यंत्रसामुग्री, मशनिरीसह दर्जेदार असे कमल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची सेवा सुरू केली.या रूग्णालयात दोन ऑपरेशन थिएटर, आर्थोपेडिक्स तज्ञ, रेडिओलॉजी व विजेवर थेरपी असे उपचार सुरू आहेत. डिजिटल सोनोग्राफी, डिजिटल दातांचा एक्स-रे, सिटीस्कॅन असे मशिनरी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या रुग्णालयात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी योजना सुरू करण्यात आली आहे याद्वारे रुग्णांना मोफत व माफक दरात उपचार केले जातात यामुळे रुग्णांची चांगली सोय झाली आहे या रुग्णालयात डॉक्टर रवी जानकर व डॉक्टर के प्रसाद हे देखील डॉक्टर कैलास सनमडीकर यांच्याबरोबर काम करीत आहेत.

 

या रूग्णालयात न्यूरो सर्जन,युरो सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, गुडघा जॉइंट सर्जन, चेहऱ्याचे व तोंडाचे आघात सर्जन, स्पाईन सर्जन असे एम. डी. एस डॉकटर मिरज व सांगली येथील तज्ञ डॉक्टर भेटी देऊन ऑपरेशन करत असल्याचे डॉ. सनमडीकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.