कवठेमहांकाळ,संकेत टाइम्स : कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय श्रद्धा विजय पाटील कवठेमहांकाळ येथील श्री महांकाली हायस्कूल ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आहे.तिचे वडील विजय पाटील हे सर्पमित्र म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत.वडिलांचं पाहून तिने पण सर्पमित्र होण्याची इच्छा वडिलांना सांगितलं वडिलांच्या पावलावर पाव ठेवत तिने साप पकडणारे नवदुर्गा म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाली. आज तिला सर्पमित्र’ म्हणून ओळखतात.
सापाला पाहताच अनेकांना भीती वाटते आणि विषारी साप असतील तर माणूस पाहताच क्षणी बेशुद्ध होऊन जातो. पण सांगली जिल्हातील एक महिला अशा सापांना सहज पकडते. तिने आतापर्यंत सुमारे 10 हजार साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत,हा विक्रमच आहे.सांगली जिल्ह्यातील पहिलीच महिला सर्पमित्र जी वयाच्या 18 व्या वर्षापासून साप पकडतेय कुची येथील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय श्रद्धा विजय पाटील यांना अनेकजण ‘सर्पमित्र’ म्हणतात. सापांच्या प्रजाती वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्या काम करताहेत.
श्रद्धा पाटील ह्या सांगली जिल्ह्यातील पहिल्या महिला सर्पमित्र आहेत. कवठेमहांकाळ भागात विशेषतः पावसाळ्यात लोक बाहेर पडणाऱ्या सापांना पकडण्यासाठी श्रद्धा यांना फोन करतात.आतापर्यंत त्यांनी मानवी वस्तीतून मोठमोठे साप तसेच विषारी सापांच्या अनेक प्रजाती पकडून त्यांना जंगलात सोडून दिले आहे, जेथे ते नैसर्गिक वातावरणात राहू शकतील.श्रद्धा पाटील म्हणतात की, जर कुणाला वसाहतींच्या आसपास साप दिसला तर त्यांना मारू नका. त्याऐवजी मला फोन करून सांगा. साप हा या वातावरणाचा आणि बायो सर्कलचा खूप महत्त्वाचा भाग आहे, असे त्यांचे मत आहे.
त्यांच्या अनुपस्थितीमुळे या वर्तुळाला त्रास होऊ शकतो.श्रद्धा ने ‘जगा आणि जगू द्या’च्या धर्तीवर काम करताना अनेक सापांना नवसंजीवनी दिली आहे.या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.