आशा,गटप्रवर्तकांचे प्रश्न लोकसभेत मांडा | खा.सुप्रिया सुळे यांना संघटनेकडून निवेदन

0
Post Views : 356 views
कुंडल,संकेत टाइम्स : क्रांतिअग्रणी डॉ.जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुंडल येथे कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना संसदरत्न लोकसभा खासदार श्रीमती सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आले.

 

यावेळी आशा व गटप्रवर्तकांच्या वेतन वाढीचा मुद्या लोकसभेत मांडावा या मागणीचे निवेदन लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने ही देण्यात.महाराष्ट्रांत शहरी व ग्रामीण विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 70 हजार आशा स्वयंसेविका व 4000 गटप्रवर्तक काम करतात.त्यांना कामावर आधारित मोबदला मिळतो.तो सुध्दा अत्यंत कमी मिळतो त्यामध्ये त्यांचा उदारनिर्वाह होऊ शकत नाही. त्यांना कामगार कायद्याखाली कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाहीत.

 

 

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्याचे महत्त्वाचे काम करीत असून त्यांच्या योगदानामुळे देशाच्या नागरिकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास मदत झाली आहे कोरोना महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन या महिलांनी रणरागिणी सारखे काम केले आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांची नेमणूक भारतीय संविधानाच्या 47 व्या कलमातील पूर्तता करण्यासाठी करण्यात आली आहे. त्यांचे काम कायमस्वरूपी आहे म्हणून त्यांना मानसेवी, मानधनी ,स्वयंसेविका समजणे अयोग्य आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची पदे कायद्यानुसार निर्माण केलेली पदे आहेत.
(Statuory post)  म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक शासनाचे ‘कर्मचारी” असून केंद्र /राज्य सरकार त्यांचे मालक आहे व राष्ट्रीय आरोग्य अभिमान ही आस्थापना आहे. त्यांना मिळणाऱ्या मानधनाला मोबदला म्हणून संबोधणे योग्य नाही ते वेतन आहे म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी लोकसभेत मांडून भारत सरकारकडे प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.

 

हणमंत कोळी ,लता जाधव,सुरेखा जाधव,शबाना आगा, सुवर्णा सणगर, राजश्री सुतार,रुपाली महाडिक, अरुणा कदम आदी आशा वर्कर्स उपस्थित होत्या.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.