ग्रामीण भागात शिक्षणाची सेवा देण्याचे काम होर्तीकर सरांनी केले | – माजी मंत्री जयंत पाटील

0
उमदी,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील उमदी येथील महात्मा विद्यामंदिर व ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य तथा सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य श्रीशैल होर्तीकर यांच्या सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी माजी मंत्री जयंत पाटील,माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज ‌पाटील,जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना आ.जयंत पाटील म्हणाले,गेली अनेक वर्षे जत सारख्या जिल्ह्याच्या एका टोकाला शिक्षणाची सेवा देण्याचे काम होर्तीकर सरांनी केले. १९६१ साली स्थापन झालेली सर्वोदय शिक्षण संस्था मोठ्या कष्टाने उभी केली. कलापण्णा होर्तीकर यांनी या संस्थेसाठी प्रचंड कष्ट घेतले. दोन पिढ्यांनी ही सेवा अखंड सुरू ठेवली आहे.
दुष्काळी भागात पूर्वी मुलांना शाळेत न पाठवता आपल्या सोबत रानात कामाला नेण्यास लोक प्राधान्य द्यायचे. त्या काळात ही संस्था टिकवून ठेवण्याचे काम केले गेले. आदरणीय राजारामबापूंच्या काळापासून होर्तीकर कुटुंबीय व आमच्या कुटुंबीयांचे ऋणानुबंध आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.