बेंळूखीत आठवडा बाजाराचे उद्घाटन | पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद ; व्यापाऱ्यांना आवाहन

0
Post Views : 128 views

डफळापूर,संकेत टाइम्स : बेंळूखी ता.जत येथील आठवडा बाजाराचे उद्घाटन सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती जत दुय्यम आवारचे सचिव सोमनिंग चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.प्रथमचं भरविण्यात आलेल्या या आठवडा बाजाराला मोठा प्रतिसाद लाभला आहे.पुढील आठवड्यापासून अन्य व्यापाऱ्यांनीही उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले.

Rate Card

 

बेंळूखीत बाजार भरवायचे म्हणून गावातील तरूणांनी गेल्या पंधरा दिवसापासून तयारी केली होती.व्यापाऱ्यांना बोलविण्यापासून गावातील घरोघरी सांगणे,सोशल मिडिया,ध्वनीपेक्षाद्वारे नागरिकांना आवाहन केले होते.मंगळवारी दुपारपासून व्यापाऱ्यांची गर्दी झाली,नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला.सर्व व्यापाऱ्यांना चांगला व्यवसाय झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.त्याशिवाय संयोजन केलेल्या तरूणांना त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचा आनंद दिसून आला.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती जत दुय्यम आवारचे सचिव सोमनिंग चौधरी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून सुरूवात करण्यात आली.

 

यावेळी बाजार समितीचे अधिकारी, गावातील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी,संरपच,उपसंरपच,सोसायटी चेअरमन,व्हा.चेअरमन सर्व सदस्य,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.
बाजारला महिलांचाही प्रतिसाद‌ मिळाला.
सर्व प्रकारे मदत करू ; चौधरी
बाजार समितीसह संलग्न भाजीपाला,जनावरे,भूसारीसह अनेक व्यापारी यांना या बाजारसाठी मदत करण्याचे आवाहन करू,ग्रामीण भागात असे बाजार नागरिकांना फायद्याचे ठरत आहेत.आम्ही सर्वोत्तरी मदत करू असे आश्वासन दिले.
तरूणांच्या प्रयत्नाना यश
गावातील तरूणांनी बाजार भरवायचाच म्हणून प्रयत्न केले.त्यांना प्रतिसाद मिळाला.गावातील पदाधिकारी, ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी बाजार भरविण्यात यशस्वी झालो.यापुढेही अन्य वेगवेगळे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांना आवाहन करून गावातील ग्राहकांना चांगला व सर्व प्रकारचा माल मिळावा,यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संयोजक तरूणांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.