अवैध धंदे ताबडतोब बंद करण्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावी | – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
Rate Card

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीसाठीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे लोकोपयोगी कामे आचारसंहितेत अडकू नयेत यासाठी सर्वच यंत्रणांनी त्यांच्याकडील कामे त्वरीत सुरू करावीत. ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे, अशा कामांची यादी करून त्वरीत सादर करावी. त्यातील जनतेसाठी उपयुक्त असणाऱ्या कामांची स्थगिती उठविण्यासाठी पाठपुरावा करू,असे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित केंद्र पुरस्कृत, राज्य सरकार अर्थ संकल्पातून व जिल्हा नियोजन समितीतून घेतलेल्या व घ्यावयाच्या विकास कामांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील मटकादारूजुगार आदि सर्व अवै धंदे ताबडतोब बंद  करावेत. त्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावीअसे निर्देश कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

           

 

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्हा नियोजन व्यतिरिक्त ज्या कामांसाठी राज्य अर्थ संकल्पातून होणारी कामेकेंद्र पुरस्कृत योजनाखासदार – आमदार निधीनाबार्डकडून येणारा निधी यासारख्या अन्य लेखाशिर्षामधून निधी उपलब्ध होत आहे अशा कामांबाबत अवगत करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.