येळवीत होणार श्रीसंत बाळूमामा चे भव्य मंदिर
जत,संकेत टाइम्स : लाखो भक्ताचे श्रंध्दास्थान असलेल्या श्रींसत बाळूमामाचे भव्यदिव्य मंदिर येळवी ता.जत येथे होणार आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानने या मंदिर बांधकामाची जबाबदारी उचलली असून दसऱ्यादिवशी या मंदिर बांधकांमाचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे.
चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी, येळवी सोसायटीचे चेअरमन संतोष स्वामी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
मारुती मदने यांनी प्रतिष्ठान व मंदिराच्या माध्यमातून यापुढे करण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रम, कार्याची माहिती दिली.

प्रकाश जमदाडे म्हणाले, प्रतिष्ठानचा हा उपक्रम चांगला,मंदिरामुळे येळवी परिसरात चैतन्य निर्माण होईल,लाखो भक्तांना येथे मंदिर झाल्याने दर्शनाचा लाभ होईल.श्रीसंत बाळूमामांनी दिलेली शिकवण,व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व देवस्थानने जपावी, मंदिर बांधकामाला सहकार्य करू अशी ग्वाही, प्रकाश जमदाडे यांनी दिली.
तुकाराम बाबा महाराज म्हणाले, दुसऱ्याचे अवगुण बघण्यापेक्षा चांगले गुण पहा, एखाद्याने चांगले कार्य हाती घेतले तर त्याची निंदा न करता त्यांना साथ द्यावी,अशी शिकवण भक्ति मार्गात आहे.या मंदिरामुळे भक्तिचा नवा मार्ग उपलब्ध होईल.