बँक एटीएम कार्डची आदलाबदल करून त्याद्वारे पैशावर डल्ला मारणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केले

0
Post Views : 9 views
सांगली : बँक एटीएम कार्ड धारकांची फसवणूक करून पैसे काढणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक तुम्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत ६ गुन्हे उघड करत साडेतीन लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.संभाजी गोविंद जाधव वय ३७,रा.विटा(खानापूर) असे जेरबंद केलेल्या संशयिताचे नाव आहे.
तासगाव,इस्लामपूर,कवठेमहांकाळ, जयसिंगपूर,ठाणे,म्हसवड असे ६ गुन्हे उघडीस आले आहेत.संशयित जाधव यांच्याकडून वेगवेगळ्या बँकेचे १०१ एटीएम कार्ड,रोख तीन लाख रूपये,मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.अभिलेखावरील आरोपी संभाजी जाधव याने विविध बँकेचे ए.टी.एम सेंटर वर जावुन तेथील ए.टी.एम सेंटर बर लोक पैसे काढत असताना त्यांचे मागे थांबुन आपणास पैसे काढुन देतो असे सांगुन त्यांचे एटीएम कार्ड चा पिन नंबर माहिती करुन घेवुन नंतर हातचलाखीने त्यांचे फडील एटीएम कार्ड हे स्वतःचे हातात घेऊन हातचलाखीने आपलेकडील दुसरे ए.टी.एम कार्ड त्यांना देवुन त्यांची फसवणुन करुन त्यांचे ए.टी.एम कार्डमधून वेळोवेळी त्यांचे खात्यामधून रक्कमा काढल्या आहेत.

 

सध्या तो तासगाव रोडने सांगली कडे निघाला आहे, त्याचेकडे पांढरे रंगाची मोपेड सुझुकी अँक्सेस मोटार सायकल आहे. तसेच तो अंगाने मध्यम बांध्याचा असुन त्याने अंगात पांढरे रंगाचा हाफ शर्ट व निळसर रंगाची पँट घातली आहे. अशी खात्रीशीर बातमी
मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे पथक माधवनगर येथे तासगांव रोडला सापळा लावून थांबले असता, तासगांव बाजुने पांढरे रंगाचे मोपेड गाडीवर पांढरे रंगाचा हाफ शर्ट घातलेला एक संशयित इसम येताना दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे खात्री झाल्याने त्यास सपोनि निशाणदार यांनी गाडी थांबवण्याचा इशारा करत त्याची दुचाकी बाजुस घेतली ती पांढरे रंगाची बिना क्रमांकाची सुझुकी अँक्सेस मोपेड़ गाडी होती ती जागीच थाबविली व मोपेड गाडीवरील इसमास सपोनि निशाणदार यांनी त्याचे नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव संभाजी गोविंद जाधव असलेचे सांगीतले.
त्यावेळी पंचाचे समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे शर्टाचे खिश्यात रोख रक्कम व एक काळे रंगाचे प्लास्टीकचे कार्ड होल्डर मिळुन आले ते उघडुन पाहीले असता त्यातील प्लास्टीकचे कप्यामध्ये वेगवेगळ्या बँकेची ए.टी.एम कार्ड मिळाली. त्या ए.टी.एम कार्ड व रक्कमेबाबत त्यास विचारले असता तो समाधानकारक उत्तरे देत नव्हता, त्यावेळी सपोनि निशाणदार यांनी त्याचे पँटची झडती घेतली असता पँटचे डावे खिशात रोख रक्कम मिळून आली. सदर रक्कमेबाबत त्याचेकडे चौकशी केली असता तो समाधानकारक सांगत नसल्याने त्याचे ताब्यातील मोपेडचे मालकी हक्काबाबत विचारले असता, त्याने सदरची गाडी ही त्याचा मित्र सुरज बाळासो साळुंखे रा. मंगरूळ याचे नावे असुन तो ती वापरत असतो असे सांगीतले. त्यावर सपोनि निशाणदार यांनी मोपेड गाडीची डिगी उघडुन पाहिली असता त्यामध्ये एक पांढरे रंगाचे पिशवी मिळुन आली. पिशवीमध्ये पाहिले असता त्यामध्ये वेगवेगळ्या बँकेची ए.टी.एम कार्ड, रोख रक्कम मिळुन आली.
तसेच काळे रंगाची टोपी, मास्क मिळून आले. त्यावर सपोनि निशाणदार यांनी त्यास अधिक विश्वासात घेत त्याचेकडे त्याचे ताब्यातील ए.टी.एम कार्ड व पैश्याबाबत विचारणा केली असता, संभाजी जाधव याने सांगितले की, तो दुचाकीवरून मागील काही महिन्यापासुन आजुबाजुच्या शहरातील एटीएम सेंटरमध्ये जावुन तेथे त्याचा चेहरा टोपीच्या व मास्कच्या सहाय्याने लपवुन वयस्कर किंवा ए.टी.एम मधील नवख्या लोकांना पैसे काढण्या करीता मदत करण्याचा बहाणा करीत व त्यांचे ए.टी.एम कार्ड स्व:ताकडे घेऊन त्यांचे एटीएम कार्डचे पिन माहिती करून घेत हातचलाखीने त्याच्याकडील ए.टी.एम कार्ड त्यांना देवून काहीतरी बहाणा सांगून तेथुन बाहेर जाऊन दुसऱ्या ए.टी.एम सेंटरवरती किंवा पेट्रोल पंपावरती ते ए.टी.एम कार्ड स्टॅप करून त्यातील पैसे काढले आहेत.त्यातीलच हे पैसे व एटीएम कार्ड असल्याचे सांगीतले व गुन्हे केले असल्याचे कबुली दिली.

 

त्यावेळी त्याचे कब्जातील वेगवेगळ्या बँकेची एकुण १०१ ए.टी.एम कार्ड, गुन्हयातील रोख रक्कम ३ लाख रुपये व गुन्हा करण्यासाठी वापरलेली अॅक्सेस मोपेड मोटार सायकल किमत रुपये ५० हजार असा एकुण ३,५०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीस पुढील गुन्हयाचे तपास कामी तासगाव पोलीस ठाणे कडे वर्ग करण्यात आले आहे. पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील असुन त्याचेवर यापूर्वी विटा, तासगाव या ठिकाणी मोटारसायकल चोरी, व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, त्याने या पध्दतीने सांगली, सातारा, कोल्हापुर येथे गुन्हे केले आहेत. त्याचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.