अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला ८ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा
सांगली : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला ८ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. सांगलीतील जादा विशेष जिल्हा अति(पोक्सो कोर्ट) डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला आहे.एम.आय. डी. सी. कुपवाड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी शिवाजी बसवण्णा इंगवले,(वय २३, रा. हनुमान मंदिराजवळ,दुर्गानगर एम.आय.डी.सी., मिरज, ता. मिरज, जि. सांगली) हा विवाहित असून त्याची पत्नी
घरात असताना आरोपीने अज्ञान पिंडीतेस पळवून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याने त्याच्यावर भा.द.वि.स. कलम ३७६ व बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ४ अन्वये आरोप सिद्ध झाल्याने आरोपीस ८ वर्षे सक्त मजुरीसह तुरुंगवासाची शिक्षा व रक्कम रुपये १५ हजार दंड व त्यापैंकी रुपये १२ हजार पिडीत मुलीस देणेचा आदेश केलेला आहे.दंड न भरल्यास आणखी १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.यामध्ये सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अँड. रियाज एस.जमादार यांनी संपूर्ण काम पाहिले.
