बांधकाम कामगारांच्या दिवाळी बोनससाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू | – ना.सुरेशभाऊ खाडे

0
जत : बांधकाम कामगारांच्या दिवाळी बोनससाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून प्रस्ताव मागवून घेणार आहे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मंगळवारी सकारात्मक निर्णय घेऊ,असे आश्वासन कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन (सिटु) सलग्न, लाल बावटा बाधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळास आज लिंगनूर ता मिरज येथील भेटीवेळी दिले.

 

बांधकाम कामगारांना येत्या दिवाळीला विस हजार रुपये अर्थसहाय्य द्या, बांधकाम कामगारांच्यासाठी स्वतंत्र मेडीक्लेम योजना सुरू करा, ६० वर्षांवरील बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये पेन्शन द्या, या व अन्य मागणीसाठी, दि १० आक्टोंबर २०२२ रोजी संघटनेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ना.सुरेश खाडे यांना शिष्टमंडळ भेटले.
याच मागणीसाठी गुरुवार दि १३ आक्टोंबर रोजी, कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये, दिवाळी बोनससह अन्य राज्यस्तरीय मागण्याचा प्रस्ताव, मंडळाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले होते.

Rate Card
ना.खाडे यांनी मंडळाकडून प्रस्ताव घेऊन निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीतील चर्चेला सुद्धा महत्त्वप्राप्त झाले आहे. त्यामुळे सोमवार दिनांक 17/10/2022 रोजी होणारा कामगार मंत्री यांच्या घरावरील मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. जर दिवाळी पूर्वी बोनस बाबत घोषणा न केल्यास ऐन दिवाळीत शिमगा आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेने कामगार मंत्र्यांना दिला आहे.

या शिष्टमंडळात राज्य महासचिव कॉ भरमा कांबळे, कॉ शिवाजी मगदूम, कॉ प्रकाश कुंभार, कॉ संदीप सुतार, कॉ भगवानराव घोरपडे, कॉ हणमंत कोळी, कॉ आनंदराव कराडे, कॉ मोहन गिरी, कॉ दत्ता कांबळे, कॉ संतोष राठोड, कॉ उदय निकम, कॉ दगडू कांबळे, कॉ भरत सुतार,काँ.दादासो सुतार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.