रामपूर येथील वृध्देला लुटणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

0
सांगली : जतमध्ये भाजी विक्री करून रामपूर येथे परतणाऱ्या गंगाबाई माळी (वय ८५, रा. रामपूर) यांना कारमध्ये लिफ्ट देऊन डफळापूर रोडने जाताना बेदाण्याच्या गोडाऊनजवळ लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने चालक नागेश बापू खडतरे (वय ३०, रा. नंदेश्वर जि. सोलापूर) आणि तब्बल १२ गुन्ह्यांत समावेश असलेल्या सराईत लक्ष्मी पवार (वय ३०, रा. बिसमिल्लानगर, सोलापूर) या दोघांना
सोनलकर चौक, शेगाव रोड येथे अटक केली, तर त्यांचा एक सहकारी फरार झाला आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

 

Rate Card
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील ४५ हजारांची सोन्याची बोरमाळ, रोख २ हजार रुपये व १५ हजारांची सोन्याची चेन असा एकूण १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी अटक केलेल्या लक्ष्मी पवार यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.