बेंळूखीचे संरपच संभाजी कदम यांना तालुक्यात काम करण्याची संधी देऊ ; आ.सांवत

0
डफळापूर,संकेत टाइम्स : बेंळूखी ता.जत येथील विविध विकास कामाचे भूमिपुजन व पुर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याहस्ते या कामाचे भूमिपुजन, लोकार्पण संपन्न झाले.आमदार विक्रमसिंह संवत यावेळी उपस्थित होते.

 

 

बेंळूखीचे संरपच संभाजी कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करत आपल्या दिड वर्षाच्या संधीचे सोने करत गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे खेचून आणली आहेत.सिध्दनाथ मंदिर,जोतिबा मंदिर व मायाक्का देवी मंदिर भूमिपुजन,जिल्हा परिषद शाळेतील २ वर्ग खोल्याचे भूमिपुजन,एका खोलीचे लोकार्पण,२५/१५ मधून मंजूर सभा मंडपाचे भूमिपुजन,आमदार फंडातून मंजूर झालेल्या सभामंडपाचे भूमिपुजन,मागासवर्गीय योजना,

 

१७ लाख रूपये निधीतून पुर्ण झालेल्या पेव्हिंग ब्लॉक कामाचे लोकार्पण,१४ लाख रूपये निधीतून पुर्ण झालेली व्यायाम शाळा व साहित्याचे लोकार्पण,व्यापारी सकुंल,दुकान गाळे बांधकामाचे भूमिपुजन,वॉटर एमटीएमचे लोकार्पण आदी कामांचे लोकार्पण आज झाले.

 

 

Rate Card
यावेळी बेंळूखीतील संरपच दिलेल्या दिड वर्षात प्रभावी काम करू शकले आहेत.त्यांना यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था,अथवा अन्य तालुका जिल्ह्यात नेतृत्व करण्याची संधी देऊ, असे आश्वासन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी दिले.
महादेव पाटील,दिग्विजय चव्हाण,अभिजीत चव्हाण,प्रमोद साळुंखे पाटील,शंशिकात जाधवसह अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.