ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार, बोनस द्यावा : – संघटनेची मागणी
Post Views : 20 views
जत,संकेत टाइम्स: ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा दिपावलीपुर्वी मागील थकीत पगार, थकीत कोरोना मानधन,कस्टमरी बोनस / सानुग्रह अनुदान, व गणवेश द्यावेत,अशी मागणी सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले, दिपावली सारखा मोठा सण तोंडावरती आलेला आहे परंतु बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्याचे ग्रामपंचायत स्तरावरील पगार व कोरोना मानधन थकीत आहेत.
त्याचाच भाग म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा माहे सप्टेंबर २०२२ अखेरचा सर्व मागील ग्रामपंचायत स्तरावरील थकीत पगार तसेच कस्टमरी बोनस किंवा सानुग्रह अनुदान १५ हजार बऱ्याच ग्रामपंचायतीने अद्याप ही शासनाच्या परिपत्रका नुसार दिलेला कोरोना भत्ता व गणवेश अद्याप पर्यत कर्मचाऱ्यांना दिलेला नाही,यात तालुका प्रशासनाने जातीने लक्ष घालून दिपावली पूर्वी सर्व आकृती बंधातील व आकृतीबंधा बाहेरील कर्मचाऱ्यांना सर्व देय रक्कम व गणवेश अदा करणेचे आदेश द्यावेत. गरीब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची दिपावली आपण गोड करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याचे निवेदन जनरल सेक्रेटरी अँड. राहुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली जत तालुका संपर्क प्रमुख युवराज काशीद (आवंढी) यांनी निवेदन दिले. तालुका उपाध्यक्ष श्रीकांत गुरव हे उपस्थित होते.
