राजकीय पुढाऱ्यांनो बिनविरोध शब्दाचा खरा अर्थ सर्वांना कळु द्या

0

                                                             

मुंबई क्रिकेट संघटनेवर(एमसीए) ताबा मिळविण्यासाठी सर्वच राजकीय मंडळी एकत्र का येतात.कारण पुढील तीन वर्षांमध्ये मुंबई संघटनेकडे सुमारे पाचशे कोटी रुपये येणार आहेत.त्यावर ताबा मिळविण्यासाठी एरवी एकमेकांच्या विरोधात तिक्ष्ण वार करणारे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उध्दव गट व शिंदे गट एकाच पॅनलमधुन निवडणूक लढवत आहेत. याचे खरे उत्तर आहे ते म्हणजे काही वर्षांत या संघटनेकडे येणारे सुमारे पाचशे कोटी रुपये आहेत.मुंबई क्रिकेट संघटनेच्या राजकारणामध्ये शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख यांनीही यापूर्वी सक्रीय सहभाग घेतला होता.परंतु भाजपा यापासून दूर होता.मात्र देशात व राज्यात 2014 मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपानेही या संघटनेच्या राजकारणात उडी घेतली ही स्वागतार्ह बाब आहे.

 

या वेळेस पवार आणि आशिष शेलार गटाचे उमेदवार असलेले अमोल काळे यांना बिनविरोध आणण्यासाठी राजकारण बाजूला सारून एकत्र झाल्याचे दिसून येतात.यात उध्दव गट, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे कार्यकारिणीतील उमेदवार जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, विहंग प्रताप सरनाईक हे सर्वच एकाच पॅनल मधुन लढत आहे.म्हणजे सर्वांनीच आपले तत्व, सिध्दांत, स्वाभिमान सर्वच बाजूला सारून हातमिळवणी केली.म्हणजे लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांवर ताशेरे ओढायचे, कार्यकर्त्यांनी एकमेकांसोबत दुष्मनी घ्यायची आणि ज्या ठिकाणी आवक आहे त्या ठिकाणी संपूर्ण पक्ष-विपक्ष एकत्र येतात हे खुले आम आमजनतेची दिशाभूल म्हणावी लागेल.कारण एमसीए निवडणुकीच्या मतदानापूर्वी पवार-शेलार पॅनलने सोमवारी वानखेडे स्टेडियमवर सर्व उमेदवार आणि मतदारांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते.यानिमित्याने राजकारणात शत्रृ असणारे सर्वजण क्रिकेटच्या मैदानावर एमसीएचा ताबा घेण्यासाठी एकत्र आलेले पाहायला मिळाले.

म्हणजे राजकारण करतांना लोकांना ग्यान सांगायचे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वच विसरून जायचे हा कुठला सिध्दांत व कुठले तत्व म्हणावे आणि कुठले राजकारण म्हणायचे.यावरून स्पष्ट होते की अंधेरीतील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी एमसीए निवडणुकीसाठी हातमिळवणी तर नाही ना!एमसीए निवडणूक ही फक्त अनुभवी माजी खेळाडू पर्यंत सिमित असायला पाहिजे होती.कारण कोणताही खेळ असो त्याचा उध्दार त्याच खेळातील अनुभवी खेळाडू करू शकतात.यात राजकीय हस्तक्षेप नको होता.परंतु भारताचे दुर्दैव म्हणावे लागेल की प्रत्येक क्षेत्रात राजकारण्यांना जास्त महत्त्व दिले जाते.त्यामुळेच आज संपूर्ण क्षेत्रात आपल्याला राजकीय पुढारी वरचढ झाल्याचे दिसून येते.राजकीय पुढाऱ्यांनी बिनविरोध या शब्दाचा गैरवापर न करता.सामाजिक कार्यासाठी करायला हवा.

Rate Card

 

राज्यात अनेक जटील समस्या आहेत या समस्यांवर बिनविरोध चर्चा व्हायला पाहिजे, बिनविरोध कामे व्हावीत व बिनविरोध तोडगा निघायला हवा त्यालाच करा बिनविरोध म्हणता येईल.बिनविरोध शब्दाला राजकारणापुरते सिमित न ठेवता सर्वसामान्यांना त्याचा खरा अर्थ कळला पाहिजे.महागाई, बेरोजगारी, शिक्षण, शेतकऱ्यांच्या समस्या, स्वच्छतेचा प्रश्न यावर बिनविरोध चर्चा झाली तर खरोखरच राज्याच्या जनतेचे सार्थक होईल अन्यथा नाही.कारण सध्याच्या परिस्थितीत राजकीय पुढारी बिनविरोध शब्दाचा गैरवापर करून स्वतःचे स्वार्थ पहात आहे.हीबाब अंधेरीतील पोटनिवडणूक व एमसीए निवडणुकीवरून सिध्द होते.                         

 

 

लेखक.रमेश कृष्णराव लांजेवार,मो.नं.9921690779, नागपूर.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.