बाळासाहेबाची शिवसेनेचे संपर्क प्रमुख योगेश जानकर यांचा ५ नोंव्हेबरला जत दौरा

0

जत,संकेत टाइम्स : बाळासाहेबाची शिवसेना(शिंदे गट) गटाचे संपर्क प्रमुख योगेश जानकर यांचा जत तालुका दौरा ता.५ नोंव्हेबर रोजी आयोजित केला आहे.जत येथे शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.जत तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटात चैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.जत तालुक्यात विस्तार वाढविण्यासाठी पदाधिकारी,कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे ठाणे महानगरपालिकाचे नगरसेवक,माजी शिक्षण सभापती असलेले योगेश जानकर यांच्यावर जत तालुका संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते विट्यातील भेडावंडे येथील रहिवाशी आहेत.ठाणे महानगर पालिकेत प्रभावी काम करत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले श्री.जानकर यांना जत तालुक्यात बाळासाहेबाची शिवसेना वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

Rate Card

त्या अनुषंगाने त्याचा ५ नोव्हेंबरला दौरा आयोजित करण्यात आला आहे.डफळापूर येथून जानकर यांचा दौरा सुरू होणार आहे.डफळापूर,खलाटी,जत शहरातील धार्मिक स्थळाचे ते दर्शन घेणार आहेत.दुपारी जत शहरातील सोनाई मल्टिपर्पज हॉल मध्ये ते कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत.त्याचा तेथे जत तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.