मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करावी,जत राष्ट्रवादीची मागणी
जत : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.जत तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांनी पोलीसांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
