शिष्यवृत्ती परीक्षेत डफळापूर शाळा नं 2 चे यश
जत : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता – पाचवी) शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक (इयत्ता-आठवी) शिष्यवृत्तीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. डफळापूर येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा नं 2 या शाळेतील विद्यार्थीनींनी या परीक्षेत सलग पाचव्या वर्षी उज्ज्वल यश संपादन केले. राज्याचा निकाल 23.90 टक्के लागला तर शाळेचा निकाल 90.91 टक्के लागला. असे शाळेचे मुख्याध्यापक अरविंद बंडगर यांनी सांगितले.
डफळापूर केंद्रात या शाळेच्या पहिल्या पाच मधील चार विद्यार्थ्यांनींनी क्रमांक पटकाविले. यामध्ये शांभवी गोविंद कुलकर्णी (267), चेतना शरद माळी (216), श्रेया श्रीशैल वठारे (208), समीक्षा सुरज महाजन (198), श्रावणी विनायक छत्रे (196), रिद्धी विकास शिंदे (182), तनुष्का माणिकराव माने (170), श्वेता सागर चव्हाण, समीक्षा अनिल वगरे (132), श्रेया श्रीकांत म्हेत्रे (132) यांनी यश मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थींनींचे शिक्षणविस्ताराधिकारी तानाजी गवारी व अन्सार शेख, केंद्र प्रमुख रतन जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष दत्तात्रय माळी व सर्व एस.एम.सी सदस्य यांनी कौतुक केले. उदयोगरत्न संकपाळ, अलका पवार, शंकर कुंभार, दीपाली पट्टणशेट्टी, रेखा कोरे, सुषमा चव्हाण, अजय डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
