खोटा दावा दाखल करून विमा कंपनीकडून ५० लाख लाटण्याचा प्रयत्न

0
हातकणंगले : भादोले ता.हातकणंगले येथील डॉक्टर राकेश दिनकर भारती हे दिनांक २०ऑक्टोंबर २०१९ रोजी आपली मोटार सायकल नंबर MH-09-DU-3415 या मोटार सायकल वरुन वाठार ते भादोले असे वडगांव रोडने जात असताना हॉटेल स्वागत जवळ रस्त्यावर असलेल्या खडयात त्यांची मोटार सायकल जावून ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांचेवर डायमंड हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपचार सुरु असताना ते मयत झाले आहेत. नमुद घटनेच्या अनुषंगाने वडगावं पोलीस ठाणे येथे दिनांक ३१ ऑक्टोंबर २०१९ रोजी नोंद झालेली होती व त्याची चौकशी वडगांव पोलीस ठाणेतील तत्कालीन पोलीस अंमलदार रमेश भैरु कुंभार यांनी केली होती.

 

 

यातील मोटर सायकलस्वार डॉक्टर राकेश भारती हे स्वतः रस्त्यावरील खडयात जावून पडून अपघात झाला असताना डॉक्टर भारती यांचा वाहन परवाना नुतनीकरण नसल्याने व त्यांचे मोटरसायकलचा विमा ही नसल्याने त्यांना अपघाता मध्ये नुकसान भरपाई मिळणार नाही म्हणून नमुद मोटर सायकलस्वार यांची पत्नी श्रीमती उर्मिला राकेश भारती यांनी पोलीस अंमलदार यांचेशी संगनमत करुन मोटर सायकल स्वार राकेश भारती यांचे मोटर सायकलला आप्पासाहेब मलगोंडा पाटील रा.पट्टणकोडोली यांचे मालकीची विमा असलेली मोटर सायकल नंबर MH-09-E-6355 ही मोटर सायकल धनाजी दत्तात्रय बिडकर रा. कसबा बीड ता. करवीर याचे ताबेत दाखवून त्या मोटार सायकलने मयत डॉक्टर राकेश भारती यांचे मोटार सायकलीस पाठीमागून ठोकरुन अपघात झालेचे दाखवून तसे कागदपत्रे बनवुन धनाजी बिडकर याचे विरुध्द मा.न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. दरम्यान मयत डॉक्टर राकेश भारती याची पत्नी उर्मिला भारती यांनी अपघातामध्ये नुकसान भरपाई मिळावी म्हणून टाटा ए. आय. जी. इंन्सुरन्स कंपनी व इतरांचे विरुध्द मोटार अपघात प्राधिकरण, कोल्हापूर यांचे न्यायालयात ५० लाख रुपयांचा दावा दाखल केला होता.

 

सदर दाव्यामध्ये इन्शुरन्स कंपनीस संशय आल्याने त्यांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमध्ये कोर्टाने सदर अपघाताची
Rate Card
गुन्हे अन्वेषण विभाग [ CID ] मार्फत पडताळणी / चौकशी करणेबाबत आदेश दिले होते त्या प्रमाणे डॉ. दिनेश गि.बारी,(पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर परिक्षेत्र) यांचे मार्गदर्शना खाली श्रीमती भाग्यश्री पाटील,(पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर परिक्षेत्र) यांचे करवी सदर दाव्याचे चौकशी केली असता त्यात वरील प्रमाणे अपघातामधील मयत डॉ. राकेश भारती यांचे ताबेतील मोटर सायकल खडयात जावून स्वत: पडून जखमी होवून अपघात झाला असताना त्यांचे मोटर सायकलला सी.डी. १०० मो.सा.नं. MH-09-E-6355 या मोटर सायकलने पाठीमागून ठोकरले बाबत खोटा बनाव केलेचे निष्पन्न झाले असल्याने आज रोजी वडगाव पोलीस ठाणे येथे श्रीमती भाग्यश्री पाटील, पोलीस निरीक्षक,यांनी दिले फिर्यादीवरुन गुन्हयाचा तपास करणारे पोलीस अंमलदार रमेश भैरु कुंभार,(पोलीस हवालदार, तत्कालीन नेमणूक वडगाव पोलीस ठाणे),उर्मिला राकेश भारती रा. भादोले ता.हातकणंगले,आप्पासाहेब मलगोंडा पाटील रा. पटटणकोडोली ता. हातकणंगले,धनाजी दत्तात्रय बिडकर रा.का.बीड,ता.करवीर यांचे विरुध्द फसवणूकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

 

दाखल गुन्हयाचा तपास डॉ. दिनेश गि. बारी,(पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर परिक्षेत्र) यांचे मार्गदर्शना खाली श्रीमती वर्षा कावडे,(पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर पथक) या करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.